‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला, क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ; खेळाडू व विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:53 AM2017-12-03T00:53:58+5:302017-12-03T00:54:13+5:30

केंद्र सरकारने २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने क्रीडा साहित्याच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.

'GST' costlier than 'sports'; The noise of heartbreak in players and marketers | ‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला, क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ; खेळाडू व विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर

‘जीएसटी’मुळे ‘खेळ’ महागला, क्रीडा साहित्यात भरमसाट वाढ; खेळाडू व विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर

Next

- सचिन भोसले

कोल्हापूर : केंद्र सरकारने २८ टक्क्यांपर्यंत जीएसटी लावल्याने क्रीडा साहित्याच्या किमतींमध्ये भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंबरोबर खेळही महागला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे क्रीडा क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.
दरवर्षी देशातील अनुदानित शाळांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. परंतु या जीएसटीचा बोजा शाळा व विद्यार्थ्यांवर पडत आहे. विशेष म्हणजे, क्रीडा साहित्यावर ५, १२, १८ व २८% अशा चार टप्प्यांत कराची आकारणी केली आहे.
दर्जानुसार परदेशी व भारतीय बनावटीचे क्रीडा साहित्य आधीच महाग आहे. त्यात जीएसटीच्या फोडणीने चांगलाच ठसका लागत आहे.
परदेशी बनावटीच्या क्रिकेट बॅटची किंमत ५ ते ३० हजारांदरम्यान आहे. ५ हजारांच्या बॅटवर १२ टक्के जीएसटी म्हटला तर ५६०० रुपये इतकी किंमत होते. यामध्ये केंद्राचाही जीएसटी धरला तर हीच बॅट ६२०० रुपयांवर जाते. अशीच कमी-जास्त प्रमाणात परिस्थिती इतर खेळांच्या साहित्याची आहे.

क्रीडा साहित्याच्या किमती आधीच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. त्यात जीएसटीच्या रूपाने कर आकारणी झाल्याने या वस्तू कोणी खरेदीसाठी येईनासे झाले आहे. त्यामुळे खेळ साहित्यावरील जीएसटी सरकारने रद्द करावा.
- सदा पाटील, क्रीडा साहित्य विक्रेते व ज्येष्ठ क्रिकेटपटू


साहित्य जीएसटीपूर्वीचे जीएसटीनंतरचे
दर दर
(२८%)
थाळीफेक थाळी (१ किलो) ५८० रु. ६८० रु.
गोळाफेकचा गोळा (१ किलो) ८५० रु. १०५० रु.
कॅरम बोर्ड ९५० रु. ११५० रु.
उड्या मारण्याची दोरी ५० रु. ८५ रु.
(१२%)
लेझीम ७० रु. ९० रु.
फुटबॉल ५५० रु. ६८० रु.
बॅट (भारतीय बनावट) ६०० रु. ७५० रु.
हँडग्लोज २५० रु. ३२० रु.
टेनिस रॅकेट २५० रु. जोडी ३०० रु.
टेनिस बॉल ६० रु. ७५ रु.
लेदर बॉल १८० रु. २२० रु.
सायकलिंग हेल्मेट ३८० रु. ५८० रु.

Web Title: 'GST' costlier than 'sports'; The noise of heartbreak in players and marketers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.