गुजरातचा पुण्यावर तीन गडी राखून विजय
By admin | Published: April 29, 2016 11:44 PM2016-04-29T23:44:40+5:302016-04-29T23:46:21+5:30
आयपीएलच्या नवव्या पर्वात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दिलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना गुजरात लायन्सने या अटीतटीच्या सामन्यात तीन गडी राखून विजय मिऴविला.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २९ - आयपीएलच्या नवव्या पर्वात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने दिलेल्या १९६ धावांचा पाठलाग करताना गुजरात लायन्सने या अटीतटीच्या सामन्यात तीन गडी राखून विजय मिऴविला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील या सामन्यात २० षटकात सात बाद १९७ धावा केल्या. गुजरात लायन्सचा फलंदाज ड्वेन स्मिथने ३४ चेंडूत एक षटकार आणि नऊ चौकार लगावत ६३ धावा केल्या. तर, ब्रँडन मॅक्युलमने ४३ , दिनेश कार्तिकने ३३, सुरेश रैना ३४,ड्वेन ब्राव्हो ७, जडेजा ०, जेम्स फॉल्कनरने ९ धावा केल्या.
सामन्याच्या सुरुवातीला फलंदाजीला उतरलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्सने फलंदाज स्टीव्ह स्मिथच्या शानदार शतकी खेळीच्या जोरावर २० षटकात तीन बाद १९५ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने ५४ चेंडूत पाच षटकार आणि आठ चौकारांची तूफान फटकेबाजी करत १०१ धावांची मजल मारली. मात्र ती पूर्णपणे अयशस्वी ठरली. रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून अजिंक्य रहाणेने ४५ चेंडूत ५३ धावा कुटल्या. रहाणेला गोलंदाज ड्वेन ब्राव्होने धावबाद केले. तर सुरुवातीलाच, सौरभ तिवारी अवघ्या एका धावेवर सुरेश रैनाने धावबाद करुन तंबूत परत पाठविले. स्टीव्ह स्मिथला ड्वेन ब्राव्होने बाद केले, तर कप्तान महेंद्रसिंग धोनीने नाबाद ३० धावा आणि परेराने नाबाद तीन धावा केल्या.