बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी भारताच्या कर्णधारपदी गुजराती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 12:20 AM2020-07-14T00:20:39+5:302020-07-14T00:21:02+5:30
‘फिडे रेटिंग क्रमवारीनुसार भारताचा द्वितीय क्रमांकाच्या गुजरातीकडे नेतृत्व देण्याचा निर्णय माजी विश्व विजेता विश्वनाथन आनंद व निवड समिती तसेच बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष पी. आर. वेंकटराम राजा यांनी घेतला.’
मुंबई : २२ जुलैपासून आॅनलाईन बुद्धिबळ आॅलिम्पियाडमध्ये ग्रॅन्डमास्टर विदीत गुजराती भारतीय संघाचे नेतृत्व करेल. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सचिव विजय देशपांडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, ‘फिडे रेटिंग क्रमवारीनुसार भारताचा द्वितीय क्रमांकाच्या गुजरातीकडे नेतृत्व देण्याचा निर्णय माजी विश्व विजेता विश्वनाथन आनंद व निवड समिती तसेच बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष पी. आर. वेंकटराम राजा यांनी घेतला.’
भारतीय संघ असा
विश्वनाथन आनंद, विदीत गुजराती ( कर्णधार), पेंटेला हरिकृष्ण (राखीव), अरविंद चिदम्बरम ( राखीव) खुला गट महिला: कोनेरू हम्पी, द्रोणावली हरिका, भक्ती कुलकर्णी, (राखीव), आर. वैशाली ( राखीव) ज्युनिअर मुले:निहाल सरीन, आर. प्रग्यानंदा (राखीव) ज्युनिअर मुली: दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल (राखीव)