गुजरातचे पारडे जड
By admin | Published: January 23, 2017 12:32 AM2017-01-23T00:32:10+5:302017-01-23T00:32:10+5:30
फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या शेष भारत संघाच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी
मुंबई : फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या शेष भारत संघाच्या गोलंदाजांनी
दमदार कामगिरी करुन गुजरातच्या दुसऱ्या डावावर नियंत्रण ठेवले असले तरी पहिल्या डावातील १३२ धावांच्या आघाडीमुळे सामन्यात अद्यापही गुजरातचे पारडे जड आहे.
येथील ब्रेबॉर्न स्टेडीयमवर तिसऱ्या दिवसअखेरीस गुजरातच्या आठ बाद २२७ धावा झाल्या होत्या. शेष भारत संघावर त्यांनी एकूण ३५९ धावांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या दोन विकेट अद्याप शिल्लक आहेत.
पहिल्या डावात शतक केलेल्या चिराग गांधीने १४५ मिनिटे क्रीजवर ठाण मांडले असून सात चौकारासह त्याने नाबाद ५५ धावा केल्या आहेत. शेष भारतच्या शाहबाज नदीमने शानदार प्रदर्शन करताना २३ षटकांत ५३ धावा देवून ४ बळी घेतले. सकाळी पहिल्या सत्रात पंकजसिंहने सुमित गोहिल याला लवकर बाद केल्यामुळे प्रियांक पांचाळने (७३) संयमी खेळ केला. सिध्दार्थ
कौलने पांचाळला बाद केले.
कर्णधार पार्थिव पटेल ३२ धावा करुन परतला. यानंतर चिरागने जबाबदारी खांद्यावर घेत तळाच्या फलंदाजांच्या साथीने धावसंख्येला आकार दिला. चौथ्या डावात शेष भारतला साडेतीनशेहून अधिक धांवांचे आव्हान गाठावे लागणार आहे. परंतु चिंंतन गजा आणि कंपनीपुढे ही अशकयप्राय गोष्ट वाटते आहे.
(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक-
गुजरात पहिला डाव : १0२.५ षटकात सर्वबाद ३५८ धावा (चिराग गांधी १६९, मनप्रीत जुनेजा ४७; सिध्दार्थ कौल ५/८६, पंकज सिंग ४/१0४).
शेष भारत पहिला डाव : ७५ षटकांत सर्वबाद २२६ धावा. (अखिल हेरवाडकर ४८, चेतेश्वर पुजारा ८६; चिंतन गजा ४/६0, हार्दिक पटेल ३/७९.)
गुजरात दुसरा डाव : ७९ षटकांत ८ बाद २२७ धावा. (प्रियांक पांचाळ ७३, चिराग गांधी नाबाद ५५; नदिम ४/५३, मोहम्मद साईराज
२/ ३९)