गुजरातचे दिल्लीपुढे १७३ धावांचे लक्ष्य

By admin | Published: April 27, 2016 09:37 PM2016-04-27T21:37:46+5:302016-04-27T21:40:56+5:30

स्मिथ-मॅक्युलमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने निर्धारीत २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य आहे.

Gujarat's target of 173 runs ahead of Delhi | गुजरातचे दिल्लीपुढे १७३ धावांचे लक्ष्य

गुजरातचे दिल्लीपुढे १७३ धावांचे लक्ष्य

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ : दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा कर्णधार झहीर खानने गुजरात लायन्स संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सुरवातीलाच गुजरातच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करत दिल्लीचा निर्णय चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. स्मिथ-मॅक्युलमच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरातने निर्धारीत २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी १७३ धावांचे लक्ष्य आहे.
 
सलामीवीर स्मिथ-मॅक्युलमने पावरप्लेच्या ६ षटकात ७१ धावा चोपल्या. स्मिथ-मॅक्युलमने ताबडताफ फलंदाजी करताना ११२ धावांची सलामी दिली. स्मिथने ३० चेंडूत ५३ धावा केल्या त्याला इम्रान ताहिरने बाद केले. स्मिथ बाद झाल्यानंतर मॅक्युलमही लगेच माघारी परताला आणि गुजरातच्या धावसंखेली खीळ बसली. मॅक्युलमने ६० धावांचे योगदान दिले. कर्णधार रैना आज अपयशी ठरला त्याला २ धावावर मॉरिसने बाद केले.
दिनेश कार्तिक(१८),  जडेजा (४), इशान किशन (२) यांना लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. मधल्या फळीतील फलंदाज लवकर बाद झाल्याने दिल्लीला थोडा आराम मिळाला. आणि गुजरातला मोठ्या धावसंख्या उभा करण्यापासून रोखले. ब्राव्हो (७) आणि फॉक्नरने (२२) धावांचे योगदान दिले.
दिल्लीकडून झहीर खान सर्वात महागडा गोलंदाज ठरला त्याने ४ षटकात ४८ धावांची लयलूट केली. इम्रान ताहिरने ३, मॉरिस २ आणि डुमनीने एका फलंदाजाला बाद केले. 
 

Web Title: Gujarat's target of 173 runs ahead of Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.