मला आव्हान स्वीकारण्याची सवय - रवी शास्त्री

By admin | Published: July 12, 2017 05:53 PM2017-07-12T17:53:48+5:302017-07-12T18:11:06+5:30

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा सध्याचा भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अधिक चांगली कामगिरी करुन दाखवू शकतो.

The habit of accepting the challenge - Ravi Shastri | मला आव्हान स्वीकारण्याची सवय - रवी शास्त्री

मला आव्हान स्वीकारण्याची सवय - रवी शास्त्री

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 12 - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा सध्याचा भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अधिक चांगली कामगिरी करुन दाखवू शकतो असे मत भारतीय क्रिकेट संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बुधवारी व्यक्त केले. भारताच्या याआधीच्या संघांच्या तुलनेत आताचा संघ उजवी कामगिरी करेल असा अशावाद शास्त्री यांनी व्यक्त केला. बीसीसीआयने मंगळवारी रात्री उशिरा टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी शास्त्री यांच्या नावाची घोषणा केली. 
 
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण या तीन सदस्यीय समितीने प्रशिक्षकपदी शास्त्री यांची निवड केली. 2014 ते 2016 या कालावधीत रवी शास्त्री टीम इंडियाचे संचालक होते. 55 वर्षीय शास्त्री यांची पुढच्या दोन वर्षापर्यंत 2019 वर्ल्डकपपर्यंत प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. आगामी श्रीलंका दौ-यात शास्त्रींची पहिली परिक्षा असेल. श्रीलंकेत भारतीय संघ तीन कसोटी, पाच वनडे आणि एक टी-20 सामना खेळणार आहे. 26 जुलैपासून भारताच्या या दौ-याला सुरुवात होईल. 
 
अनिल कुंबळे यांनी तडकाफडकी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे अनेक वाद निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कितपत आव्हानात्मक असेल या प्रश्नावर शास्त्री म्हणाले की, मला नेहमीच आव्हाने स्वीकारायला आवडतात. जेव्हा तुम्हाला ढगाळ वातवरणात सलामीला जायला सांगितले जाते तेव्हा ते आव्हान असते. मला आव्हाने स्वीकारण्याची सवय आहे असे शास्त्री यांनी सांगितले. 
 
आणखी वाचा 
रवी शास्त्रींवर वचक ठेवण्यासाठी झहीर, राहुल द्रविडची निवड ?
रवी शास्त्री यांचा ICC क्रिकेट कमिटीमधून राजीनामा
विराट कोहलीच्या निर्णयावर रवी शास्त्री आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची टीका
 
माजी कर्णधार सौरव गांगुलीबरोबर असलेल्या मतभेदांबद्दल शास्त्री म्हणाले की, आम्ही दोघे माजी कर्णधार आहोत. काही मुद्यांवर मतभेद आहेत पण परस्पराबद्दल आदरही आहे. मागच्यावर्षी प्रशिक्षकपदाची संधी हुकल्याबद्दल रवी शास्त्री यांनी सौरव गांगुलीला जबाबदार धरुन टीका केली होती. 
 
प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांच्या नावाची घोषणा करताना सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झहीर खान आणि राहुल द्रविड यांची नावे जाहीर करण्यात आली. पोर्ट स्टाफ म्हणून झहीर खान आणि राहुल द्रविडची निवड ही रवी शास्त्रींवर लादली गेलीय असेही म्हणता येईल. अनिल कुंबळेच्या आधीचे भारताच्या सीनियर संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रेग चॅपल, गॅरी कस्टर्न आणि डंकन फ्लेचर यांना त्यांच्या पसंतीचा सपोर्ट स्टाफ मिळाला होता. चॅपल यांनी सपोर्ट स्टाफमध्ये इयन फ्रेझर, कस्टर्न यांनी पॅड अपटॉन, इरीक सीमॉन्स आणि डंकन फ्लेचर यांनी ट्रेव्हर पेनीची निवड केली होती. त्यातुलनेत शास्त्रींना ते स्वातंत्र्य मिळालेले नाहीय. 
 

Web Title: The habit of accepting the challenge - Ravi Shastri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.