क्लार्कपाठोपाठ हॅडिनचीही वन-डेतून निवृत्ती

By admin | Published: March 30, 2015 11:56 PM2015-03-30T23:56:51+5:302015-03-30T23:56:51+5:30

आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने संघाला विश्वविजेतपद मिळवून दिल्यानंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला

Haddin retires from one-day cricket | क्लार्कपाठोपाठ हॅडिनचीही वन-डेतून निवृत्ती

क्लार्कपाठोपाठ हॅडिनचीही वन-डेतून निवृत्ती

Next

मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कने संघाला विश्वविजेतपद मिळवून दिल्यानंतर वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला; आता त्याच्यापाठोपाठ उपकर्णधार ब्रॅड हॅडिननेही निवृत्तीची घोषणा केली आहे.
न्यूझीलंडचा पराभव करीत विश्वचॅम्पियन ठरलेल्या आॅस्ट्रेलियन संघातील ३७ वर्षीय हॅडिनने निवृत्तीची घोषणा केली. यापूर्वी क्लार्कने अंतिम लढतीपूर्वीच वन-डेमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते. निवृत्ती स्वीकारण्याची हीच वेळ योग्य असल्याचे हॅडिन म्हणाला. आॅस्ट्रेलिया संघ आता वन-डे क्रिकेटमध्ये नव्या अध्यायाला प्रारंभ करणार असल्याचे हॅडिनने सांगितले. हॅडिन व क्लार्क यापुढेही कसोटी क्रिकेट खेळणार आहेत. विंडीज व इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिकेत संघाचे नेतृत्व करणार असल्याचे क्लार्कने स्पष्ट केले होते.
हॅडिनने निवृत्तीच्या निर्णयाला विनोदाचा मुलामा दिला. हॅडिन म्हणाला, ‘‘न्यूझीलंडच्या खेळांडूच्या सभ्य व विनम्र वर्तनामुळे मी यापुढे वन-डे क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडच्या खेळाडूंचे वर्तन सभ्य होते. मी अशाप्रकारे क्रिकेट खेळू शकत नाही.’’ (वृत्तसंस्था)

Web Title: Haddin retires from one-day cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.