आॅस्ट्रेलियाविरुद्ध वनडे मालिकेसाठी हफीजचा समावेश
By admin | Published: January 9, 2017 01:03 AM2017-01-09T01:03:53+5:302017-01-09T01:03:53+5:30
आयसीसीने मोहम्मद हाफीज याची गोलंदाजीची शैली योग्य असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्याचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाच वनडे
कराची : आयसीसीने मोहम्मद हाफीज याची गोलंदाजीची शैली योग्य असल्याचे स्पष्ट केल्यानंतर त्याचा आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाच वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तानी क्रिकेट संघात समावेश केला आहे.
आयसीसीने ब्रिस्बेन येथे अनुभवी अष्टपैलू खेळाडू हफीजच्या गोलंदाजी शैलीचे परीक्षण केले होते आणि त्यात त्याची गोलंदाजी शैली योग्य असल्याचे आढळून आले आणि त्यानंतर त्याची राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. हफीजने देशांतर्गत स्पर्धेत गोलंदाजी करणे सुरू केले होते.
आॅस्ट्रेलियाला जाण्याआधी हफीज म्हणाला, ‘‘हे माझ्यासाठी मोठे आव्हान आहे, कारण मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक महिन्याआधी गोलंदाजी सुरू केली आणि जवळपास दीड वर्षाआधी मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी केली होती.’’ आयसीसीने श्रीलंकेत एका कसोटीत त्याच्या गोलंदाजी शैलीचा अहवाल केला गेल्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात या अष्टपैलू खेळाडूवर १२ महिने बंदी लादली होती.
आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्यावर त्याला रोखले होते. पहिला वनडे १३ जानेवारीला खेळवला जाणार आहे. आॅस्ट्रेलियाने कसोटी मालिकेत पाकिस्तानचा सफाया केला होता. (वृत्तसंस्था)