निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 09:29 PM2019-06-25T21:29:04+5:302019-06-25T21:31:13+5:30

नॉर्वे स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने चक्क पाच पदकांची कमाई केली. आता तुम्ही विचार करत असाल हा खेळाडू नेमका आहे तरी कोण...

Half of the medals reached after 17 operations by Niranjan Mukundan para swimmer | निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक

निरंजनने मिटवला आयुष्यातील अंधार; १७ शस्त्रक्रीयांनंतरही गाठले पदकांचे अर्धशतक

googlenewsNext

मुंबई : जिद्द, मेहनत आणि संयम ही त्रिसूत्री तुमच्याकडे असेल तर आयुष्यामध्ये तुम्ही काहीही करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला योग्य मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तीची गरज असते. नाही तर काही वेळा गुणवान व्यक्तीलाही न्याय मिळत नाही. मात्र त्याची कहाणी प्रेरणादायी अशीच. जन्म झाल्यावरच तो अपंग असल्याचे घरच्यांना समजले. पण त्यांनी हार मानली नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांनी त्याला जलतरण खेळायला पाठवले. त्याच्यावर आतापर्यंत १७ शस्त्रक्रीया झाल्या, त्याच्या पायात ३२ रॉड्स टाकण्यात आले, तरीही हा पठ्य्या काही थांबला नाही. एवढे होऊनही त्याने कारकिर्दीतील पदकांची पन्नाशी गाठली. नॉर्वे स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये त्याने चक्क पाच पदकांची कमाई केली. आता तुम्ही विचार करत असाल हा खेळाडू नेमका आहे तरी कोण... तर हा आहे भारताचा निरंजन मुकुंदन. ‘स्पोर्ट्स किडा’ या संकेतस्थळाने १६ शस्त्रक्रीया झाल्यावर मुकुंदनची मुलाखत घेतली होती. यामधून मुकुंदनचा प्रेरणादायी प्रवास उलगडत गेला.

मुकुंदनचा जन्म झाला तेव्हा त्याचा पाठीचा कणा आणि मणका पूर्णपणे विकसित झाला नव्हता, या गोष्टीला स्पिना बिफिडा असे म्हणतात. त्याचबरोबर मुकुंदनचे पायही पूर्णपणे तंदुरुस्त नव्हते. त्यावेळी डॉक्टरांनी मुकुंदनच्या पालकांना त्याला घोडेस्वारी किंवा जलतरण या खेळांमध्ये सहभाग घेण्यास सांगितले. त्यानंतर मुकुंदन पाण्यात उतरला आणि प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडचे पाणी त्याने पळवले.

मुकुंदन जेव्हा पाण्यात जायचा तेव्हा त्याच्या पायांची चांगली हालचाल व्हायची. पण पाण्यातून त्याला बाहेर काढल्यावर मात्र त्याचे पाय जास्त हलत नव्हते. त्यामुळे मुकुंदनला पोहायला पाठवण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला. वयाच्या आठव्या वर्षांपासून मुकुंदनने जलतरण करायला सुरुवात केली आणि आता २४व्या वर्षी त्याने पदकांचे अर्धशतक गाठले आहे.

आतापर्यंत मुकुंदनवर १६ शस्त्रक्रीया करण्यात आल्या. त्यामधील एक शस्त्रक्रीया तर तब्बल १६ तास चालली. मुकुंदनचे पाय सरळ व्हावे, यासाठी ३२ रॉड्स टाकण्यात आले. पायांची क्षमता वाढल्यावर हे रॉड्स काढण्यातही आले. मुकुंदनच्या आयुष्यामध्ये जन्मापासूनच वाईट क्षण पाहायला मिळाले, पण त्याने हार मानली नाही. शारीरिक आणि मानसीक या दोन्ही आघाड्यांवर मुकुंदनने कणखरता दाखवली आणि त्यामुळेच त्याला आजचा सुवर्णदिन पाहायला मिळत आहे.

Web Title: Half of the medals reached after 17 operations by Niranjan Mukundan para swimmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.