जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत हम्पीचे १२ व्या स्थानी समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 03:24 AM2020-01-01T03:24:03+5:302020-01-01T03:24:12+5:30

भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे जागतिक महिला रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत दुसरे जेतेपद पटकावण्यात अपयश आले.

Hampi finished 5th in World Blitz Chess Tournament | जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत हम्पीचे १२ व्या स्थानी समाधान

जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत हम्पीचे १२ व्या स्थानी समाधान

googlenewsNext

मॉस्को : भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे जागतिक महिला रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत दुसरे जेतेपद पटकावण्यात अपयश आले. या दोन दिवसीय ब्लिट्झ स्पर्धेत अखेर तिला १२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. रशियाची कॅटरिना लागनो व नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन यांनी अनुक्रमे महिला व पुरुष ब्लिट्झ स्पर्धेत आपले जेतेपद कायम राखले.

शनिवारी चीनच्या ली टिंगजीविरुद्ध आर्मेगेडोन लढत अनिर्णीत राखत जागतिक महिला रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकणारी हम्पी पहिल्या दिवशी ९ फेऱ्यांमध्ये ७ गुण मिळवीत दुसºया स्थानी होती. पण यानंतर तिला आपली लय कायम राखता आली नाही आणि अखेर १७ फेºयांमध्ये १०.५ गुण मिळवता आले. हम्पीने ब्लिट्झ स्पर्धेच्या दुसºया दिवशी सुरुवातीच्या दोन लढतींमध्ये विजय मिळविला होता. त्यानंतर तिने दोन लढती अनिर्णीत राखल्या आणि १३ व्या फेरीनंतर लागनोसह संयुक्तपणे अव्वल स्थानी होती.

हम्पी व लागनो यांचे १३ व्या फेरीअखेर समान १० गुण होते. त्यानंतर १४ व्या फेरीत भारतीय खेळाडूने रशियाच्या अलिसा गॅलियामोव्हा विरुद्धची लढत बरोबरीत सोडविली व तिची दुसºया स्थानी घसरण झाली. (वृत्तसंस्था)

हरिकाकडून निराशा
बाळाला जन्म दिल्यानंतर २०१६ ते २०१८ या कालावधीत खेळापासून दूर असलेल्या हम्पीने अखेरच्या तीन लढती गमावल्या व ती जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकली गेली. अन्य एक भारतीय हरिका द्रोणवल्ली महिला ब्लिट्झमध्ये स्पर्धेत २५ व्या स्थानी राहिली. लागनोने संभाव्य १७ पैकी १३ गुणांची कमाई करीत जेतेपद पटकावले. युक्रेनची अन्ना मुजीचुक १२.५ गुणांसह दुसºया स्थानी राहिली.

Web Title: Hampi finished 5th in World Blitz Chess Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.