"हॅप्पी बर्थडे सचिन" आजही क्रिकेटप्रेमींच्या ओठी सचिन, सचिनच

By Admin | Published: April 24, 2017 09:03 AM2017-04-24T09:03:08+5:302017-04-24T10:23:37+5:30

जगातील सर्वोत्तम फलंदाज कोण ? यावर क्रिकेट रसिकांमध्ये चर्चा सुरु झाली की, ओठांवर पहिले नाव येते ते म्हणजे सचिन तेंडुलकरचे.

"Happy Birthday Sachin": Sachin Tendulkar, Sachin Tendulkar | "हॅप्पी बर्थडे सचिन" आजही क्रिकेटप्रेमींच्या ओठी सचिन, सचिनच

"हॅप्पी बर्थडे सचिन" आजही क्रिकेटप्रेमींच्या ओठी सचिन, सचिनच

googlenewsNext

 

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 24 - जगातील सर्वोत्तम फलंदाज कोण ? यावर क्रिकेट रसिकांमध्ये चर्चा सुरु झाली की, ओठांवर पहिले नाव येते ते म्हणजे सचिन तेंडुलकरचे. निवृत्तीच्या चारवर्षानंतरही क्रिकेटरसिकांवरील सचिन नावाची जादू कमी झालेली नाही. क्रिकेटच्या क्षितिजावरुन तुम्ही एकदा निवृत्त झालात की, लोक तुम्हाला चटकन विसरुन जातात. पण याला अपवाद आहे तो सचिन रमेश तेंडुलकर. 
 
आजही लोक तेंडुलकर या नावाला विसरलेले नाहीत. सचिन आजही कोटयावधील क्रिकेटप्रेमींच्या गळयातील ताईत आहे. आजही  सचिनला क्रिकेटचा देव मानणारा मोठा वर्ग आहे.  याच आपल्या सर्वांच्या लाडक्या सचिन तेंडुलकरने आज वयाच्या 44 व्या वर्षात पदार्पण केले. 24 एप्रिल 1973 रोजी सचिन तेंडुलकरचा मुंबईत जन्म झाला. 
 
15 नोव्हेंबर 1989 रोजी वयाच्या अवघ्या सोळाव्यावर्षी सचिनने पाकिस्तान विरुद्ध  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आपल्या पहिल्या दौ-यातच सचिनला इमरान खान, वसिम अक्रम, वकार युनूस आणि अब्दुल कादिर या पाकिस्तानच्या आग ओकणा-या गोलंदाजांचा सामना करावा लागला. पाकिस्तानी गोलंदाजांच्या यॉर्कर, बाऊन्सरचा सामना करताना सचिनने पदार्पणातच आपली छाप उमटवली. त्यानंतर पुढची 24 वर्ष सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर राज्य केले. 
 
सचिनत्या भात्यात सर्व प्रकारचे फटके असल्याने सचिनचा खेळ पाहणा-या नेत्रसुखद आणि आनंद देणारा असायचा. सचिनच्या नावावर आज इतके विक्रम आहेत की, कदाचितच कोणी या विक्रमांच्या जवळपास पोहोचू शकेल. 
 
- सचिनच्या नावावर 34,357 धावा जमा आहेत. 
 
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये 18,426 आणि कसोटीमध्ये 15921 धावा सचिनने केल्या. 
 
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर 100 शतकांची नोंद आहे.  वनडेमध्ये 49 तर, कसोटीमध्ये 51 शतके सचिनने ठोकली आहेत. 
 
- वनडेमध्ये पहिले व्दिशतक झळकवण्याचा मानही सचिनकडेच जातो. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने पहिले व्दिशतक झळकावले. 
 

Web Title: "Happy Birthday Sachin": Sachin Tendulkar, Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.