हरभजन बोहल्यावर चढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2015 02:25 AM2015-08-23T02:25:57+5:302015-08-23T02:25:57+5:30

दीर्घ काळ बाहेर राहिल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा अनुभवी आॅफ स्पिनर हरभजनसिंग हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड असलेली बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा

Harbhajan will get up! | हरभजन बोहल्यावर चढणार!

हरभजन बोहल्यावर चढणार!

Next

नवी दिल्ली : दीर्घ काळ बाहेर राहिल्यानंतर टीम इंडियात पुनरागमन करणारा अनुभवी आॅफ स्पिनर हरभजनसिंग हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. गर्लफ्रेंड असलेली बॉलिवूड अभिनेत्री गीता बसरा हिच्यासोबत तो आॅक्टोबरमध्ये सात फेरे घेईल.
वृत्तानुसार हरभजन गीतासोबत आॅक्टोबरमध्ये विवाह करेल. जालंधरपासून ६० किमी अंतरावर असलेल्या फगवाडा शहरात विवाह सोहळा आयोजित होईल. हरभजनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघात स्थान मिळाल्यास लग्नाची तारीख लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हरभजन आणि गीता हे अनेक वर्षांपासून एकत्र असले, तरी आपल्या संबंधांची त्यांनी जाहीर कबुली दिलेली नाही. दोघेही अनेकदा एकत्र दिसले.
या दोघांनी अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘सेकंड हँड हजबंड’ या चित्रपटात भूमिकादेखील केली. चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी गीताने लग्नाची लवकरच घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. सध्या भज्जी लंका दौऱ्यावर आहे. गाले कसोटीत
तो फारसा प्रभावी ठरला नाही. ९० धावांत त्याने एक गडी बाद केला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती.(वृत्तसंस्था)

Web Title: Harbhajan will get up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.