हार्दीक पांड्याची फटकेबाजी, पुण्यासमोर 185 धावांचे आव्हान

By admin | Published: April 6, 2017 10:01 PM2017-04-06T22:01:50+5:302017-04-06T22:59:16+5:30

हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने पुण्यासमोर 185 धावांचे आवाहन ठेवले आहे.

Hardeq Pandya flick, Pune faced 185 runs | हार्दीक पांड्याची फटकेबाजी, पुण्यासमोर 185 धावांचे आव्हान

हार्दीक पांड्याची फटकेबाजी, पुण्यासमोर 185 धावांचे आव्हान

Next
ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 6 - आयपीएलच्या दहाव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स आणि रायजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यात सलामीचा सामना होत आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने रायजिंग पुणे सुपरजायंट्सला धावांचे 185 आव्हान दिले आहे.

मुंबई इंडियन्सने 20 षटकात 8 बाद 184 धावा केल्या. या सामन्यात फलंदाज जोस बटलर याने सर्वाधिक जास्त धावा केल्या. बटलरने 19 चेंडूत तीन चौकार आणि तीन षटकार लगावत 38 धावा केल्या. तर, नितीश राणाने 28 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकार अशी खेळी करत 34 धावा केल्या. नितीश राणाला गोलंदाड अॅडम झाम्पा याने बाद केले. तर, जोस बटलरला इमरान ताहीरने पायचीत केले. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला जास्त धावांची खेळी करता आली नाही. तो अवघ्या तीन धावा काढून तंबूत परतला. शेवटच्या फळीत संघाला सावरत हार्दिक पांड्याने चांगली कामगिरी केली. त्याने नाबाद 15 चेंडूत चार षटकार आणि एक चौकार लगावत 35 धावांची खेळी केली. तर पार्थिव पटेल 19, अंबाती रायडू 10, कृणाल पांड्या 3, पोलार्ड 27 आणि टीम सौथीने 7 धावा केल्या.  

रायजिंग पुणे सुपरजायंट्सकडून गोलंदाज इमरान ताहीरने सर्वाधिक तीन बळी टिपले. तर रजत भाटीयाने दोन आणि अॅडम झाम्पा व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. 

Web Title: Hardeq Pandya flick, Pune faced 185 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.