हार्दिक, केदार संघाचे भविष्य : विराट

By admin | Published: July 8, 2017 01:18 AM2017-07-08T01:18:18+5:302017-07-08T01:18:18+5:30

हार्दिक पांड्या आणि केदार जाधव हे भारतीय संघाचे भविष्य आहेत, त्यांच्यासारखे खेळाडू संघात असल्याबद्दल मी खूश असून, हे

Hardik, future of Kedar Sangh: Virat | हार्दिक, केदार संघाचे भविष्य : विराट

हार्दिक, केदार संघाचे भविष्य : विराट

Next

किंग्स्टन : हार्दिक पांड्या आणि केदार जाधव हे भारतीय संघाचे भविष्य आहेत, त्यांच्यासारखे खेळाडू संघात असल्याबद्दल मी खूश असून, हे फलंदाज तळाच्या स्थानावर आक्रमकता जोपासतात, असे कर्णधार विराट कोहलीचे मत आहे.
अपेक्षा असताना कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेत संघात फारसे काही बदल केले नाहीत. मालिका ३-१ ने जिंकल्यानंतर कोहली म्हणाला, ‘तुम्ही कुठल्याही संघाला सहजपणे घेऊ शकत नाही. हार्दिक आणि केदारसारख्यांना तुम्ही वरच्या स्थानावर तसेच आघाडीच्या फलंदाजांना तळाच्या स्थानावर खेळवू शकत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघांचा सन्मान राखावाच लागतो. खेळपट्टीचे स्वरूप कसे आहे, हे ओळखून डावपेचांवर ठामपणे
अमल करण्याविषयी विचार केला पाहिजे.’
हार्दिक आणि केदार यांच्यात आम्ही सर्व खेळाडू आत्मविश्वास जागविण्याचे काम करतो. त्यांच्या क्षमतेवर विश्वास असल्याने दोघेही प्रभावी कामगिरी करण्यास नेहमी सज्ज असतात, असे सांगून तो म्हणाला, ‘नेहमी एकसारखे बाद होणे आपल्याला पसंत नाही. चुका सुधारणे तसेच कामगिरी करणे, हेच माझ्या यशाचे गमक आहे.’ (वृत्तसंस्था)

सचिनला टाकले मागे
लक्ष्याचा पाठलाग करताना १८ वे शतक झळकवित कोहलीने सचिनला मागे टाकले. कोहलीचे करिअरमधील हे २८ वे शतक होते. सचिनने २३२ धावांत लक्ष्याचा पाठलाग करताना १७ शतके ठोकली होती. तिसऱ्या स्थानावर तिलकरत्ने दिलशान आहे. त्याने लक्ष्याचा पाठलाग करीत ११६ डावांत ११ शतके ठोकली.

Web Title: Hardik, future of Kedar Sangh: Virat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.