हार्दिकचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट’

By admin | Published: July 6, 2017 01:42 AM2017-07-06T01:42:35+5:302017-07-06T01:42:35+5:30

चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे.

Hardik's Fall 'Turning Point' | हार्दिकचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट’

हार्दिकचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट’

Next

- सौरव गांगुली
चौथ्या वन डेत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आज गुरुवारी खेळला जाणारा पाचवा आणि अखेरचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण बनला आहे. पाहुणा संघ १९० धावांचे सहज लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. या पराभवास जबाबदार खेळाडूृंना धारेवर धरले गेले. कुमकुवत विंडीजविरुद्ध सामना गमविल्यामुळे टीका होणे स्वाभाविक आहे.
अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर हे लक्ष्य लहान वाटत असले तरी अवघड होते. प्रामाणिकपणे बोलायचे तर हे लक्ष्य मुळीच सोपे नव्हते. विकेटवर पाय रोवणे आणि नंतर लक्ष्य गाठणे असे विजयाचे समीकरण होते. हे काम पूर्ण करण्यासाठी अजिंक्य रहाणे आणि महेंद्रसिंग धोनी हे दोन फलंदाज होते. दोघेही खेळपट्टीवर स्थिरावले पण विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. धोनीने चांगली सुरुवात केली पण लक्ष्य भेदण्यात तो देखील अपयशीच ठरला. वन डे क्रिकेटमध्ये धोनीचे तंत्र वेगळेच आहे. अनेकदा तो आपल्या तंत्रात यशस्वी ठरला पण या सामन्यात तो स्वत:च्या चक्रव्यूहात अडकला असावा. अशा परिस्थितीत यश आणि अपयशामध्ये पुसटशी रेषा असते. धोनीला स्वत:चा प्रयत्न यशस्वी करता आला नाही. माझ्यामते हार्दिक पांड्याचे बाद होणे ‘टर्निंग पॉर्इंट ’ ठरला. तो चांगला फलंदाज आहे शिवाय धोनीच्या सोबतीने दडपण झुगारण्यात पटाईत मानला जातो. त्यानंतर रवींद्र जडेजा हा देखील धोनीची साथ देण्यात अपयशी ठरला. या पराभवामुळे कितीही टीका झाली झाली तरी अँटिग्वॉच्या खेळपट्टीवर लक्ष्याचा पाठलाग खरोखर कठीण होता, हे मान्य करावे लागेल. या खेळपट्टीवर चेंडू जुना झाला की अधिक धोकादायक ठरतो. चेंडू कधी उसळी घेईल, याचा वेध घेणे कठीण होते शिवाय वेगवान आॅफ ब्रेक मारा खेळणे अधिक कठीण होऊन बसते. धोनी लवकर बाद झाला असता तर सामना देखील फार आधी संपला असता.
भारताला अखेरचा वन डे जमैकाच्या मैदानावर खेळायचा आहे. येथील खेळपट्टी अँटिग्वाच्या तुलनेत चांगली आहे. हा सामना भारताने जिंकायलाच हवा. भारतीय संघात काही बदल होऊ शकतील. पण जे बदल होतील त्या स्थितीतही विंडीजवर विजय नोंदवायलाच हवा. (गेमप्लान)

Web Title: Hardik's Fall 'Turning Point'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.