हरिप्रसाद ठरला पराग ‘श्री’

By admin | Published: December 30, 2014 02:19 AM2014-12-30T02:19:56+5:302014-12-30T02:19:56+5:30

नुकत्याच पार पडलेल्या ‘पराग श्री २०१४’ शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलाच्या हरिप्रसाद एस.पी. याने अपेक्षित कामगिरीसह विजेतेपद पटकावले.

Hariprasad becomes Parag 'Shree' | हरिप्रसाद ठरला पराग ‘श्री’

हरिप्रसाद ठरला पराग ‘श्री’

Next

मुंबई : मुंबई बॉडी बिल्डिंग असोसिएशन, ग्रेटेर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशन व मुंबई सबर्बन बॉडी बिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच पार पडलेल्या ‘पराग श्री २०१४’ शरीरसौष्ठव स्पर्धेत भारतीय नौदलाच्या हरिप्रसाद एस.पी. याने अपेक्षित कामगिरीसह विजेतेपद पटकावले.
मालाड येथील अप्पा पाडा येथे रंगलेल्या या स्पर्धेत तळवलकरच्या सागर कातुर्डे याने हरिप्रसादला कडवी टक्कर देताना उपविजेतेपदाचा मान मिळवला. त्याचवेळी बॉडी वर्कशॉपच्या प्रणीत माने याने उत्कृष्ट प्रदर्शन करताना ‘बेस्ट पोझर’ पारितोषिकावर सहजपणे कब्जा केला.
एकूण ८८ स्पर्धकांचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत विविध वजनीगटाच्या एकूण ७ वजनी गटांत विजेतेपदासाठी चुरस रंगली. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात झालेल्या मुलुंड ‘श्री’ स्पर्धेत बाजी मारल्यानंतर कामगिरीत सातत्य राखताना हरिप्रसादने या स्पर्धेतील किताबावर सहजरीत्या कब्जा केला.
(क्रीडा प्रतिनिधी)

गटनिहाय निकाल
५५ किलो : प्रथम : किशोर कदम (परब फिटनेस); द्वितीय : नितीन शिगवण (वक्रतुंड जिम); तृतीय : जितेश पवार (आर.के.एम.)
६० किलो : प्रथम : अरुण पाटील (जयभवानी जिम); द्वितीय : अरुण दास (इंडियन नेवी); तृतीय क्रमांक : सुनील सकपाळ (आर.एम. भट्ट)
६५ किलो : प्रथम : विलास घडवले (बॉडी वर्कशॉप); द्वितीय : नितीन म्हात्रे (पावर झोन); तृतीय : जयेश दैत्य (हार्डकोर जिम)
७० किलो : प्रथम : श्रीनिवास खारवी (माँ साहेब); द्वितीय : जयकुमार (इंडियन नेव्ही); तृतीय : विकास सकपाळ (बाल मित्र व्यायामशाळा)
७५ किलो : प्रथम : सागर कतुर्डे (तळवलकर जिम); द्वितीय क्रमांक : संदीप कडू (स्लीम वेल जिम); तृतीय : अमित सिंग (आर.एम. भट्ट)
८० किलो : प्रथम : साकेंदर सिंग (आर.के.एम.); द्वितीय : अभिषेक खेडेकर (बॉडी वर्कशॉप); तृतीय : वाहीद बांबुवाला (वाय.एफ.सी.)
८० किलो वरील : प्रथम : हरिप्रसाद एस.पी. (इंडियन नेवी); द्वितीय : विराज सरमळकर (आर.के.एम.); तृतीय : दीपक त्रिपाठी (तळवलकर).

Web Title: Hariprasad becomes Parag 'Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.