हरप्रीत सिंगने जिंकले कांस्यपदक

By admin | Published: May 11, 2017 12:44 AM2017-05-11T00:44:04+5:302017-05-11T00:44:04+5:30

भारतीय मल्ल हरप्रीत सिंगने आशियाई कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन ८० किलो वजन गटात चीनच्या जुनजे नाचा पराभव करून भारताला पहिल्या दिवशी कांस्यपदक जिंकून दिले.

Harpreet Singh won the bronze medal | हरप्रीत सिंगने जिंकले कांस्यपदक

हरप्रीत सिंगने जिंकले कांस्यपदक

Next

नवी दिल्ली : भारतीय मल्ल हरप्रीत सिंगने आशियाई कुस्ती स्पर्धेत ग्रीको रोमन ८० किलो वजन गटात चीनच्या जुनजे नाचा पराभव करून भारताला पहिल्या दिवशी कांस्यपदक जिंकून दिले.
हरप्रीतने लढतीच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पण त्याला चीनच्या जुनजे नाने तेवढाच प्रतिकार केला. पहिली फेरी संपली तेव्हा दोघेही़ १-१ गुण बरोबरीत होते. दुसऱ्या फेरीत हरप्रीतने दुहेरी पट काढीत ३-१ अशी आघाडी घेतली. चीनचा मल्ल अंतिम क्षणापर्यंत गुण मिळविण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, हरप्रीतने कडवा प्रतिकार करीत शेवटी विजय नोंदविला.
विजयानंतर हरप्रीत म्हणाला, की माझ्यावर खूप दबाव होता. कारण आज झालेल्या इतर लढतीत सर्व मल्ल पराभूत झाले होते व माझ्याकडूनच पदकाची केलेली अपेक्षा मला ती पूर्ण करायची होती.
दुसरीकडे ७५ किलो गटात गुरप्रीत सिंहला चीनच्या बिन यांगकडून ३८ मिनिटात ०-८ गुणांनी पराभव पत्करावा लागला.

Web Title: Harpreet Singh won the bronze medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.