हर्षा

By admin | Published: February 13, 2015 12:38 AM2015-02-13T00:38:23+5:302015-02-13T00:38:23+5:30

टीम इंडियाची ताकद कमी झाली

Harsha | हर्षा

हर्षा

Next
म इंडियाची ताकद कमी झाली
हर्षा भोगले
भारतीय संघ गतविजेता असला तरी यावेळी या संघाचा जेतेपदाच्या दावेदारांमध्ये समावेश नाही. जर विश्वकप स्पर्धेचे आयोजन भारतात झाले असते तर गतचॅम्पियन संघाचा निश्चितच जेतेपदाच्या दावेदारामध्ये समावेश असता. पण, आता येथील परिस्थितीमुळे भारतीय संघाची ताकद हिसकावल्या गेली आहे. भारतीय संघ विश्वकप स्पर्धेत कशी कामगिरी करतो, याची जगातील चाहत्यांना प्रतीक्षा आहे.
भारतीय संघ आठ फलंदाज आणि सहा गोलंदाजांसह समतोल साधण्यासाठी प्रयत्नशील असतो. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि काही अंशी श्रीलंका संघाचा समतोल अशाच पद्धतीने साधल्या गेल्याचे दिसून येत आहे. उर्वरित संघांना चमकदार कामगिरी करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. भारतीय संघही याच गटात मोडतो. भारतासाठी गोलंदाजी चिंतेची बाब आहे. उमेश यादव व मोहम्मद शमी यांच्याकडे प्रतिभा आहे, पण या दोन्ही गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. युवा खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे. भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करताना या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांवर वर्चस्व गाजविणे आवश्यक आहे, पण कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे त्यात ते अपयशी ठरले आहे. सामन्याचा निकाल सुरुवातीला विकेट घेण्यावर अवलंबून असतो. गोलंदाजांसाठी अखेरच्या षटकांत वर्चस्व गाजविण्यासाठी सुरुवातीला बळी घेणे आवश्यक आहे. भारतीय संघाला सुरुवातीला बळी घेण्यात यश मिळत नाही, त्यामुळे अखेरच्या षटकांमध्ये धावगतीवर अंकुश राखणे भारतीय गोलंदाजांना अडचणीचे भासत आहे.

Web Title: Harsha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.