आयपीएलच्या समालोचनातून हर्षा भोगले बाहेर
By admin | Published: April 11, 2016 02:17 AM2016-04-11T02:17:58+5:302016-04-11T02:17:58+5:30
भारतीय समालोचनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेल्या हर्षा भोगले यांचा आवाज आयपीएलच्या नवव्या सत्रात ऐकू येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने भोगले यांना समालोचनातून निलंबित केले
भारतीय समालोचनाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेल्या हर्षा भोगले यांचा आवाज आयपीएलच्या नवव्या सत्रात ऐकू येणार नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने भोगले यांना समालोचनातून निलंबित केले आहे. हर्षा भोगले यांनीच सोशल नेटवर्कवर ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘आयपीएल’चे हे सत्रही अत्यंत लोकप्रिय होईल अशी मला आशा आहे. मी पुन्हा माझ्या अत्यंत आवडत्या क्रिकेट लीगचा हिस्सा बनने नक्कीच आवडेल. असे सांगून ते म्हणाले, मला निलंबनाची कोणतीही सूचना देण्यात आली नाही. हा निर्णय बीसीसीआयचा आहे एवढेच मला सांगण्यात आले.’ खेळाडूंचे मत विचारात घेतल्यानंतर बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेवेळी अमिताभ बच्चन यांनी समालोचकाचे नाव घेता टीका केली होती. खेळाडूंवर वैयक्तिक टीका न करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. तसेच विदर्भ क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबरही भोगले यांचा वाद झाला होता. मात्र अद्याप खरे कारण समजू शकलेले नाही.