हर्षा भोगलेंना समालोचक पदावरून हटवलं

By admin | Published: April 10, 2016 02:11 PM2016-04-10T14:11:11+5:302016-04-10T14:14:30+5:30

यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या समालोचकांच्या यादीतून प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना बाजूला करण्यात आलं आहे. बीसीसीआयने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Harsha Bhogalena's commentator removed from the post | हर्षा भोगलेंना समालोचक पदावरून हटवलं

हर्षा भोगलेंना समालोचक पदावरून हटवलं

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10- यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या समालोचकांच्या यादीतून प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांना बाजूला करण्यात आलं आहे. बीसीसीआयने यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आयपीएलचे प्रक्षेपण करणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसनं हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया आणि मान्यवर व्यक्तींच्या प्रतिक्रियांवरून समालोचकांची निवड करण्यात येते. हर्षा भोगले यांनी आयपीएल सुरू होण्यापूर्वी आपण आनंदी असल्याचे म्हटले होते. पण आता त्यांना कोणतेही कारण न देता हटविण्यात आल्यानं सगळीकडेच हा चर्चेचा विषय झाला आहे.
हर्षा भोगले यांना हटविण्यामागे बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे ट्विट असल्याची आता चर्चा आहे. ट्वेंटी-20 विश्वकरंडकादरम्यान अमिताभ बच्चन यांनी हर्षा भोगलेंना भारतीय खेळाडूंवर जास्त लक्ष्य देण्याचा सल्ला दिला होता. त्याचे महेंद्रसिंह धोनीनेही समर्थन केले होते.

Web Title: Harsha Bhogalena's commentator removed from the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.