हर्षा जोड

By admin | Published: February 13, 2015 12:38 AM2015-02-13T00:38:19+5:302015-02-13T00:38:19+5:30

टीम इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्यावेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो त्यावेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे दिसून येते. क्षेत्ररक्षणही दर्जेदार भासते आणि कामचलावू गोलंदाजही सेट फलंदाजांवर वर्चस्व गाजवितात, पण ऑस्ट्रेलियातील खेळप˜्या टणक आहेत. फिरकीपटूंना या खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. येथे भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसून येते. खेळप˜ीकडून मदत मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे फलंदाजांवर अधिक धावा फटकाविण्याचे दडपण राहणार आहे. जर चांगली सुरुवात मिळाली तर भारतीय फलंदाजांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. असे जर घडले तर भारतीय फलंदा

Harsha pair | हर्षा जोड

हर्षा जोड

Next
म इंडियातर्फे आतापर्यंत चमकदार कामगिरी करणारा भुवनेश्वर कुमारही संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. स्पिन केवळ भारताची शक्ती नसून धोनीसाठी कम्फर्ट झोन ठरत आहे. ज्यावेळी चेंडू थांबून येतो आणि टर्न होतो त्यावेळी धोनीचे नेतृत्व उल्लेखनीय ठरत असल्याचे दिसून येते. क्षेत्ररक्षणही दर्जेदार भासते आणि कामचलावू गोलंदाजही सेट फलंदाजांवर वर्चस्व गाजवितात, पण ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या टणक आहेत. फिरकीपटूंना या खेळपट्टीकडून मदत मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. येथे भारतीय संघ पिछाडीवर असल्याचे दिसून येते. खेळपट्टीकडून मदत मिळविण्यासाठी मेहनत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे फलंदाजांवर अधिक धावा फटकाविण्याचे दडपण राहणार आहे. जर चांगली सुरुवात मिळाली तर भारतीय फलंदाजांमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे. असे जर घडले तर भारतीय फलंदाज वर्चस्व गाजविण्यास सज्ज आहेत. रोहित शर्मा, शिखर धवन, सुरेश रैना हे भारतीय फलंदाज मॅच विनर ठरू शकतात, पण त्यात ते लवकर बाद होण्याचा धोकाही असतो. त्यामुळे भारतीय संघाची भिस्त विराट कोहलीवर अधिक अवलंबून आहे. कोहली फॉर्मात असला तर दडपण झुगारण्यास सक्षम असतो. जर एक इच्छा पूर्ण करण्याचा वर मिळाला तर भारतीय संघ निश्चितच कोहलीला सूर गवसावा हाच वर मागेल.
अजिंक्य रहाणेनेही छाप सोडली आहे. तो या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये स्थान मिळवू शकतो. त्याचप्रमाणे कर्णधार धोनीलाही सूर गवसणे आवश्यक आहे. पण, २०११ च्या विश्वकप स्पर्धेत युवराजच्या समावेशामुळे संघाचा समतोल साधल्या गेला होता, यावेळी मात्र त्याची उणीव भासत आहे. आता रवींद्र जडेजाला ही भूमिका बजवावी लागणार असून स्टुअर्ट बिन्नीकडूनही चांगल्या कामगिरीची आशा आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली तर तो चांगला निकाल असेल आणि जेतेपद कायम राखले तर सोनेपे सुहागा. (टीसीएम)

Web Title: Harsha pair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.