हाशिम आमलाने रचला नवा विक्रम
By admin | Published: May 30, 2017 01:04 AM2017-05-30T01:04:28+5:302017-05-30T01:04:28+5:30
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम आमलाने नवा विक्रम रचताना भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. इंग्लंडविरुद्धच्या
लंडन : दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज हाशिम आमलाने नवा विक्रम रचताना भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आमलाने ७ हजार धावांचा टप्पा पार करताना सर्वात कमी सामन्यांमध्ये ही कामगिरी करण्याचा कोहलीचा विक्रम मोडला.
आमलाने इंग्लंडविरुद्ध २३ वी वैयक्तिक धाव घेतल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा टप्पा गाठला. यासाठी त्याने केवळ १५० डाव खेळले हे विशेष. हीच कामगिरी कोहलीने १६१ डावांमध्ये केली होती. दखल घेण्याची बाब म्हणजे, आमलाने याआधी कोहलीचा सर्वात जलद ६ हजार धावा उभारण्याचा विक्रमही मोडला होता. त्याचबरोबर सर्वात कमी डावांमध्ये २ हजार, ३ हजार, ४ हजार आणि ५ हजार धावा काढण्याचा विक्रमही आमलाच्याच नावावर आहे. सर्वात कमी ७ हजार धावा काढण्याच्या यादीमध्ये आमला व कोहलीनंतर एबी डीव्हिलियर्स (१६६), सौरभ गांगुली (१७४), ब्रायन लारा (१८३), डेस्मंड हेन्स (१८७), जॅक कॅलिस (१८८) आणि सचिन तेंडुलकर, ख्रिस गेल, धोनी (तिघेही १८९) यांचा क्रमांक आहे.