हाशिम अमलाचा रेकॉर्ड, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं
By admin | Published: February 10, 2017 09:18 PM2017-02-10T21:18:47+5:302017-02-10T21:50:28+5:30
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण
Next
>
ऑनलाइन लोकमत
सेंच्युरियन , दि. 10 - दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम अमलाने शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण केली आहेत. श्रीलंकेविरूद्ध सुरू असलेल्या वन-डे सामन्यात त्याने 154 धावा फटकावल्या. अशी कामगिरी करणारा तो जगातील सातवा फलंदाज बनला आहे. त्याच्या 154 धावांच्या जोरावर आफ्रिकेने श्रीलंकेला 385 धावांचं आव्हान दिलं आहे.
सर्वाधिक शतक झळकावण्याच्या यादीत भारतीय दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर १00 शतकांसह अव्वल स्थानावर आहे. अमलाने येथे श्रीलंकेविरुद्ध पाचव्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावताना ही कामगिरी केली. या शैलीदार फलंदाजाने १00 कसोटी सामन्यांत २६ आणि १४५ वनडे सामन्यात २४ शतके ठोकली आहेत.
अमला आधी तेंडुलकर (१00 शतके), आॅस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग (७१), श्रीलंकेचा कुमार संगकारा (६३), दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस (६२) आणि श्रीलंकेचा माहेला जयवर्धने (५४) आणि वेस्ट इंडीजचा ब्रायन लारा (५३) यांनी ही कामगिरी केली आहे. या यादीतील फक्त अमलाच सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. दक्षिण आफ्रिकेचा डिव्हिलियर्स (४५ शतके) आणि भारताचा कर्णधार विराट कोहली (४३) हेदेखील याा यादीत स्थान मिळवण्याच्या स्थितीत आहेत. अमलाने वनडेतील २४ वे शतक पूर्ण करताना आपला सहकारी डिव्हिलियर्सशी बरोबरी साधली. वनडेत सर्वाधिक शतके तेंडुलकर (४९), पाँटिंग (३0), सनथ जयसूर्या (२८), कोहली (२७) आणि संगकारा (२५) यांच्या नावावर आहे.