आयपीएल ८ द्वारे शानदार पुनरागमन करायचे
By admin | Published: April 4, 2015 04:09 AM2015-04-04T04:09:49+5:302015-04-04T04:09:49+5:30
किंग्ज इलेव्हन पंजाबशी करार झाल्यानंतर इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये पहिले पाऊल ठेवण्यास आतुर असलेला लेगस्पिनर योगेश
इंदौर : किंग्ज इलेव्हन पंजाबशी करार झाल्यानंतर इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) मध्ये पहिले पाऊल ठेवण्यास आतुर असलेला लेगस्पिनर योगेश गोलवलकरने आज या प्रसिद्ध टी २0 स्पर्धेच्या आठव्या पर्वाद्वारे भारतीय भूमीवरील स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे असल्याचे म्हटले आहे.
३५ वर्षीय गोळवलकर म्हणाला, ‘‘मी आयपीएलशी प्रथमच जुळलो गेल्यामुळे खूप उत्साहित आहे. किंग्ज इलेव्हनने माझ्याशी करार करून महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आयपीएल ८ माझ्यासाठी मोठ्या संधीप्रमाणे आहे. मी याद्वारे भारतीय भूमीवर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करू इच्छितो.’’
या लेगस्पिनरने सांगितले की, त्याने २00८-0९ मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान मध्यप्रदेशकडून अखेरचा प्रथमश्रेणी सामना खेळला होता. त्यानंतर तो एमबीएच्या अभ्यासासाठी ब्रिटनला गेला होता. तो २0१४ मध्ये मायदेशात परतला आणि एका आयटी फर्ममध्ये तो काम करू लागला.
तो म्हणाला, मी प्रथमश्रेणी क्रिकेटचा जास्त आनंद घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी माझ्या मनाचा आवाज ऐकून अभ्यासासाठी ब्रिटनला जाण्याचा निर्णय घेतला; परंतु क्रिकेट माझ्या जीवनातून कधीच गायब झाले नाही. मी इंग्लंडमध्ये अभ्यासादरम्यान व्यावसायिक क्रिकेट खेळत राहिलो.’’ या ३५ वर्षीय गोलंदाजाने म्हटले, ‘‘शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांच्यासारख्या गोलंदाजांनी त्यांच्या कारकीर्दीत उत्कृष्ट गोलंदाजी केली तेव्हा तो वयाच्या तिशीत होता. तथापि, अनुभवाच्या बळावर मी अजूनही चांगली कामगिरी करू शकतो.’’
गोळवलकरने २0 वर्षांच्या वयात मध्यप्रदेशकडून खेळताना स्पर्धात्मक क्रिकेट जगतात पहिले पाऊल ठेवले होते; केनिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय अ संघात निवड झाली तेव्हा त्याची राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली.