एमसीएच्या याचिकेवर आज सुनावणी
By admin | Published: April 26, 2016 05:36 AM2016-04-26T05:36:41+5:302016-04-26T05:36:41+5:30
मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
नवी दिल्ली : दुष्काळात होरपळून निघालेल्या महाराष्ट्रातून इंडियन प्रीमिअर लीगचे (आयपीएल) नऊ सामने अन्य राज्यांत हलविण्याच्या विरोधात मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर आज मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
पाण्याचा अपव्यय होत असल्याचे कारण देत मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील आयपीएल सामने इतरत्र हलविण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाला एमसीएने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला सोबत घेऊन सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. पूर्व निर्धारित वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातच या सामन्यांचे आयोजन व्हावे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात १३ सामने महाराष्ट्राबाहेर हलविण्यास सांगितले होते. ३० एप्रिलनंतर महाराष्ट्रात आयपीएलचा एकही सामना आयोजित करू नका, असे आयोजकांना बजावले. पण बीसीसीआयच्या विनंतीनंतर १ मे रोजी पुण्यात सामना आयोजित करण्यास परवानगी बहाल केली.
अन्य सामने मात्र राज्याबाहेरच करण्याचा आदेश कायम होता.
(वृत्तसंस्था)