जिंकेल तो आत, हरेल तो बाहेर !

By admin | Published: March 27, 2016 03:39 AM2016-03-27T03:39:29+5:302016-03-27T03:39:29+5:30

जेतेपदाचा सर्वांत प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ‘टीम इंडिया’ने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी केली नसल्याने ग्रुप दोनमधून बाद फेरी

He wins it inside, he's out of it! | जिंकेल तो आत, हरेल तो बाहेर !

जिंकेल तो आत, हरेल तो बाहेर !

Next

मोहाली : जेतेपदाचा सर्वांत प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या ‘टीम इंडिया’ने टी-२० विश्वचषकाच्या पहिल्या तिन्ही सामन्यांत प्रतिष्ठेला साजेशी कामगिरी केली नसल्याने ग्रुप दोनमधून बाद फेरी गाठण्यासाठी संघापुढे अवघड आव्हान उभे ठाकले आहे. स्पर्धेची उपांत्य फेरी गाठायची झाल्यास आज, रविवारी आॅस्ट्रेलियाचा अडथळा दूर करणे अनिवार्य असेल. त्यासाठी सर्व आघाड्यांवर सरस कामगिरी करण्याचे आव्हान राहील.
पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ४७ धावांनी पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात भारताने पाकवर सहा गड्यांनी विजय साजरा केला. तिसऱ्या सामन्यात बांगला देशच्या फलंदाजांनी बेजबाबदार फटके मारले नसते आणि कर्णधार धोनीने शक्कल लढवून धावबाद केले नसते, तर भारताला एका धावेने विजय मिळू शकला नसता.
आॅस्ट्रेलियाने मात्र सामन्यागणिक कामगिरी सुधारली. पाकला ‘करा किंवा मरा’ लढतीत नमवित दावा भक्कम केला. जेम्स फॉल्कनर आणि शेन वॉटसन यांच्या मते भारताला त्यांच्या भूमीत नमविणे तसे
कठीणच. पण आॅस्ट्रेलियावर विजय मिळविणे सोपे नाही, हे यजमान संघाला चांगले ठाऊक आहे.
जानेवारीत भारतीय संघाने आॅस्ट्रेलियाला त्यांच्या मैदानावर तीन सामन्यांच्या मालिकेत नमविले होते. त्यावेळी वेगळा संघ होता. यावेळी परिस्थितीही वेगळी आहे. भारताचे स्टार फलंदाज अद्याप चमकलेले नाहीत. रोहीत शर्मा, शिखर धवन यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. विराट कोहलीवर सर्वाधिक भिस्त राहील. रैनाने बांगला देशविरुद्ध ३० धावा केल्या तरीही त्याला आणि युवराजला योगदान द्यावेच लागेल. बांगला देशविरुद्ध भारताचे क्षेत्ररक्षण फारसे चांगले नव्हते.

पाकिस्तान आणि बांगला देशला नमविताना जी दमछाक झाली त्यातून बोध घेणार आहोत. टी-२० मध्ये फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भरीव कामगिरी करणे तसेच भावनांवर नियंत्रण राखणे आवश्यक असते. आॅस्ट्रेलियाला नमविण्यासाठी नेमके हेच करावे लागेल. आॅस्ट्रेलियाला नमविणे कठीण आहे पण जानेवारीत ३-० ने मिळालेल्या विजयापासून प्रेरणा घेऊ. त्यांना कसे हरवायचे याकडे लक्ष देत आहोत. - विराट कोहली.

भारताला भारतात नमविणे अत्यंत कठीण असले तरी आम्ही उद्याच्या सामन्यासाठी सज्ज आहोत. आम्ही रनरेटकडे न बघता थेट विजयासाठीच खेळणार आहोत. भारताला भारतात पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळी करावी लागेल. माझा हा अखेरचा सामना ठरू शकतो. भारत अद्याप क्षमतेनुरूप खेळलेला नाही तरीही या संघाविरुद्ध खेळणे अवघड आव्हान असते. - शेन वॉटसन

संघ यातून निवडणार
भारत : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), विराट कोहली, सुरेश रैना, रोहीत शर्मा, युवराज सिंग, रवीचंद्रन अश्विन, जसप्रित बुमराह, शिखर धवन, हरभजन सिंग, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, पवन नेगी, आशिष नेहरा, हार्दिक पंड्या, अजिंक्य रहाणे.

आॅस्ट्रेलिया : स्टीवन स्मिथ (कर्णधार), शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर, एश्टोन एगर, जेम्स फॉल्कनर, जॉन हेस्टिंग्स, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅण्ड्र्यू टाये, अ‍ॅडम जम्पा, पीटर नेव्हिल, मिशेल मार्श, जोश हेजलवुड, अ‍ॅरोन फिंच, नाथन कुल्टर नाईल.

पीसीए स्टेडियम, मोहाली
सायंकाळी ७.३० पासून

Web Title: He wins it inside, he's out of it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.