ओव्हलमध्येही डब्बा गुल!

By admin | Published: August 16, 2014 12:08 AM2014-08-16T00:08:27+5:302014-08-16T00:08:27+5:30

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तरी भारतीय संघ लढाऊ वृत्ती दाखवेल, असे वाटत होते. मात्र, महेंद्रसिंग धोनी वगळता कोणीही लढाऊ बाणा दाखवला नाही

Heavy dabba Gul! | ओव्हलमध्येही डब्बा गुल!

ओव्हलमध्येही डब्बा गुल!

Next

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत तरी भारतीय संघ लढाऊ वृत्ती दाखवेल, असे वाटत होते. मात्र, महेंद्रसिंग धोनी वगळता कोणीही लढाऊ बाणा दाखवला नाही. ओल्ड ट्रॅफर्डप्रमाणे इंग्लंडच्या गोलंदाजांनी ओव्हलमध्येही भारताचा डब्बा गुल केला. इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव १४८ धावांत गडगडला. या उत्तरात मैदानात आलेल्या अ‍ॅलेस्टर कुक आणि सॅम रॉबसन यांनी संयमी खेळ करून पहिल्या दिवसअखेर बिनबाद ६२ धावा केल्या.
पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल अ‍ॅलेस्टर कुकच्या बाजूने लागला आणि खेळपट्टीचा अचूक अंदाज बांधत त्याने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच षटकात त्याचा हा निर्णय जेम्स अ‍ॅण्डरसन याने योग्य ठरवला. त्याच्या या धक्क्यानंतर क्रिस जॉर्डन आणि क्रिस वोक्स यांनी भारताचा कणा मोडून इंग्लंडला पहिल्याच दिवशी फ्रंटसिटवर बसवले. या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
पावसामुळे एक तास उशिराने सुरू झालेल्या या सामन्यात खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत इंग्लंडच्या गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. २० षटकांच्या आत भारताचा निम्मा संघ ३६ धावांवर माघारी धाडून इंग्लंडने त्यांना निर्धार पक्का केला होता. इंग्लंड गोलंदाजांची भारतावर इतकी दहशत पसरली होती की स्टुअर्ट बिनी आणि महेंद्रसिंग धोनी या जोडीने सहाव्या विकेटसाठी १२ षटके खेळून काढत अवघ्या ८ धावा केल्या. बिन्नीचा अडथळा अ‍ॅण्डरसनने दूर करताच आर अश्विनसह धोनीने २४ धावांची भागीदारी करून संघर्ष केला. मात्र, वोक्सने अश्विनला माघारी पाठवून तो थांबवला. त्यानंतर भुवनेश्वर कुमार आणि वरुन अ‍ॅरोन यांनी अनुक्रमे जॉर्डन व वोक्सने बाद करून भारताची अवस्था ९० धावांवर ९ बाद अशी दयनीय केली, परंतु एका बाजूला धोनी तळ ठोकून होता. त्याने इशांत शर्माला सोबत घेत चतुराईने आणि तितक्याच आक्रमकपणे खेळ केला. त्याला ब्रॉडने बाद केले.

Web Title: Heavy dabba Gul!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.