हिना सिद्धूचा निर्णायक क्षणी नेम चुकला
By admin | Published: April 14, 2015 02:04 AM2015-04-14T02:04:57+5:302015-04-14T02:04:57+5:30
विश्व क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू भारतीय नेमबाज हिना सिद्धू आरएसएसएफ विश्वचषक नेमबाजीच्या अंतिम फेरीपासून वंचित राहिली.
चोंगवान (कोरिया) : विश्व क्रमवारीतील माजी नंबर वन खेळाडू भारतीय नेमबाज हिना सिद्धू आरएसएसएफ विश्वचषक नेमबाजीच्या अंतिम फेरीपासून वंचित राहिली. चौथ्या दिवशी महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात हिनाचा नेम थोड्या फरकाने चुकला.
पात्रता फेरी आटोपल्यानंतर हिना आणि अन्य पाच नेमबाजांकडे ४०० पैकी ३६५ गुण होते. या फेरीत प्रत्येक नेमबाजाला ४० शॉट मारायचे होते. पण हिनाने अन्य नेमबाजांच्या तुलनेत ‘इनर टेन’मध्ये सर्वांत दूर नेम साधताच ती बाहेर झाली. अन्य प्रतिस्पर्धी फायनलसाठी पात्र ठरले.
दहा मीटर एअर रायफलमधील दुसरी भारतीय खेळाडू श्वेता चौधरी पात्रता फेरीत ३७८ गुणांसह ३४ व्या आणि अन्नुराजसिंग ३७५ गुणांसह ५५ व्या स्थानावर आली. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये लज्जा गोस्वामी, एलिझाबेथ सुसान कोशी आणि अंजली भागवत या सर्व जणी पात्रता फेरीपुढे सरकण्यात अपयशी ठरल्या. लज्जाने ५७८ गुणांसह १६ वे, एलिझाबेथने ५७६ गुणांसह २० वे आणि अंजलीने ५६६ गुणांसह ५७ व्या स्थानावर समाधान मानले. या स्पर्धेत क्रोएशियाची पी. सन्जेजाना हिने विश्वचषकात स्वत:चे दुसरे सुवर्ण जिंकले. तिने अंतिम फेरीत ४६३ गुण नोंदवित विश्वविक्रमदेखील केला.
पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात आॅलिम्पिक रौप्यविजेता विजय कुमार आणि गुरुप्रीतसिंग यांनी पात्रता फेरीत पहिल्या राऊंडमध्ये २७८ गुण नोंदविले. हे दोघेही फायनलमध्ये खेळण्याआधी दुसऱ्या पात्रता फेरीला सामोरे जाणार आहेत. (वृत्तसंस्था)
पात्रता फेरी आटोपल्यानंतर हिना आणि अन्य पाच नेमबाजांकडे ४०० पैकी ३६५ गुण होते. या फेरीत प्रत्येक नेमबाजाला ४० शॉट मारायचे होते.
हिनाने अन्य नेमबाजांच्या तुलनेत ‘इनर टेन’मध्ये सर्वात दूर नेम साधताच ती बाहेर झाली. अन्य खेळाडू फायनलसाठी पात्र ठरले.