टीम इंडियाचा ‘आई’ला सलाम!
By Admin | Published: October 30, 2016 03:01 AM2016-10-30T03:01:07+5:302016-10-30T03:01:07+5:30
लिंगभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंनी शनिवारी विशाखापट्टणम येथे न्यूझीलंडविरुद्धच पाचव्या व अखेरच्या वन-डे लढतीदरम्यान आपल्या आईचे
मुंबई : लिंगभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंनी शनिवारी विशाखापट्टणम येथे न्यूझीलंडविरुद्धच पाचव्या व अखेरच्या वन-डे लढतीदरम्यान आपल्या आईचे नाव असलेली जर्सी परिधान केली. भारतीय संघाचे प्रायोजक अधिकार असलेल्या स्टार इंडियाच्या ‘नवे विचार’ या मोहिमेअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले.
याबाबत स्टार इंडियाने स्पष्ट केले, ‘‘नवा संदेश देण्यासाठी आमच्या संघाने शनिवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढतीदरम्यान आईच्या नावाचा उल्लेख असलेली जर्सी परिधान केली. त्यामुळे लक्षावधी चाहते प्रेरित होतील
आणि समाजात बदल घडण्यास
मदत मिळेल. आमचा संघ ‘नवा विचार’ निर्माण करण्यासाठी दूत म्हणून काम
करणार आहे.
स्टार इंडियाचे चेअरमन आणि मुख्य कार्यकारी उदय शंकर म्हणाले, ‘‘संघाच्या जर्सीचा समाजामध्ये बदल घडविण्यासाठी वापर करण्यात आला. असे जगात प्रथमच घडत आहे. (वृत्तसंस्था)
विजयी ‘बार’!
फलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर अनुभवी फिरकी गोलंदाज अमित मिश्राच्या भेदक माऱ्याच्या जोरावर टीम इंडियाने पाहुण्या न्यूझीलंडला १९० धावांनी लोळवले. या धमाकेदार विजयासह भारताने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर ३-२ असा कब्जा करुन भारतीयांना दिवाळी भेट दिली.