आला रे ! विराट कोहली फिट, मुंबई इंडियन्सविरोधात पुनरागमन

By admin | Published: April 13, 2017 12:27 PM2017-04-13T12:27:46+5:302017-04-13T12:29:00+5:30

आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खुशखबर असून कर्णधार विराट कोहलीला फिट जाहीर करण्यात आलं आहे

Hello! Virat Kohli Fit, comeback against Mumbai Indians | आला रे ! विराट कोहली फिट, मुंबई इंडियन्सविरोधात पुनरागमन

आला रे ! विराट कोहली फिट, मुंबई इंडियन्सविरोधात पुनरागमन

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी खुशखबर असून कर्णधार विराट कोहलीला फिट जाहीर करण्यात आलं आहे. शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरोधात होणा-या सामन्यात विराट कोहली संघात पुनरागमन करणार आहे. शुक्रवारी हा सामना होणार आहे. दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलेय्या भारतीय कर्णधार विराट कोहलीने याआधीच 14 एप्रिल रोजी होणा-या लढतीद्वारे पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते.
 
कोहलीने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यामध्ये त्यात तो घाम गाळत असल्याचे दिसत होतं. कोहली वेट ट्रेनिंग करीत असलेल्या या व्हिडीओमध्ये तो हळूहळू पूर्ण फिटनेस मिळवत असल्याचं दिसत होतं. कोहलने पोस्टमध्ये लिहिले होते की ‘मैदानावर परतण्यासाठी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही. आता पुनरागमनासाठी सज्ज आहे ??? १४ एप्रिल? कोहलीने पोस्टवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. पुनरागमन अद्याप निश्चित नसल्याचं त्यावेळी विराटने म्हटलं होतं. पण आता त्याला फिट जाहीर करण्यात आलं असून त्याचं पुनरागमन नक्की झालं आहे. 
 
ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी सामन्यात खेळताना विराट कोहलीच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. चार सामन्यांच्या मालिकेतील तिस-या सामन्यात पहिल्याच दिवशी विराटला ही दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला चौथा सामनाही खेळता आला नव्हता. आयपीएलमधीलही सुरुवातीच्या सामन्यांना या दुखापतीमुळे त्याला मुकावं लागलं. 
बीसीसीआयच्या मेडिकल टीमने भारतीय क्रिकेट संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहली फिट असून खेळी शकतो असं सांगितलं आहे. 
 
आरसीबीने आयपीएलच्या या सत्रात आतापर्यंत तीन सामने खेळले असून फक्त एकच विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या पुनरागमनाची संघालाही प्रतिक्षा लागली होती. विराट कोहलीच्या समावेशामुळे संघाचं मनोबल नक्की वाढेल ज्याचा परिणाम येणा-या सामन्यांमध्ये पहायला मिळेल. 
 
गेल्याच आठवड्यात विराट कोहलीने प्रतिक्रिया देताना जोपर्यंत मी 120 टक्के फिट नसेन तोपर्यंत आयपीएलमध्ये खेळणार नाही असं जाहीर केलं होतं. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी आपला फिटनेस जास्त महत्वाचं असल्याचं विराटने यावेळी सांगितलं होतं. 
 

Web Title: Hello! Virat Kohli Fit, comeback against Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.