रियोच्या तयारीसाठी खेळाडूंना मदत
By admin | Published: January 5, 2016 11:56 PM2016-01-05T23:56:52+5:302016-01-05T23:56:52+5:30
रियो आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाच्या आशा उंचाविण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी बॉक्सर विकास कृष्णन, सुमित सांगवान आणि
Next
नवी दिल्ली : रियो आॅलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाच्या आशा उंचाविण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी बॉक्सर विकास कृष्णन, सुमित सांगवान आणि थाळीफेकीतील महिला खेळाडू सीमा अंतिल (पुनिया) आणि नेमबाज चैनसिंग यांना राष्ट्रीय क्रीडा विकास कोषातून आर्थिक मदतीची घोषणा केली.
२०१० चा आशियाई खेळातील सुवर्ण विजेता विकास कृष्णन याला रियो आॅलिम्पिकपर्यंत खासगी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेश कुमार यांची सेवा घ्यायाची आहे. त्याला ४५ लाख, सांगवानला ३० लाख दिले जातील. सीमा अंतिलला ७५ लाख, नेमबाज चैनसिंग याला ४० लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे क्रीडा मंत्रालयाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)