आॅस्ट्रेलिया भारतात घेणार माँंटी पानेसरची मदत

By admin | Published: January 18, 2017 04:20 AM2017-01-18T04:20:35+5:302017-01-18T04:20:35+5:30

क्रिकेट आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे.

Helping the poultry of Australia to take Australia to India | आॅस्ट्रेलिया भारतात घेणार माँंटी पानेसरची मदत

आॅस्ट्रेलिया भारतात घेणार माँंटी पानेसरची मदत

Next


मेलबोर्न : क्रिकेट आॅस्ट्रेलियाने पुढील महिन्यात होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी आता भारत दौऱ्याची तयारी करण्यासाठी इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पनेसरची फिरकी गोलंदाज सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
सिडनीमध्ये क्लब क्रिकेटपटू म्हणून खेळत असलेल्या ३४ वर्षीय पानेसरने २०१२-१३ मध्ये इंग्लंडला भारतात संस्मरणीय विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे क्रिकेट आॅस्ट्रेलियाने त्याची निवड केली आहे. पनेसरने त्यावेळी तीन कसोटी सामन्यांत १७ बळी घेतले होते.
आॅस्ट्रेलियन मीडियाच्या वृत्तानुसार पनेसर या आठवड्यात सेंटर आॅफ एक्सलन्सचा दौरा करणार असून तो फिरकीपटू स्टीव्ह ओ किफे व्यतिरिक्त सलामीवीर मॅट रेनशॉ यांच्यासोबत काम करणार आहे. पनेसरची नियुक्ती क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे हाय परफारमन्स व्यवस्थापक पॅट होवार्ड यांच्या मतानुसार करण्यात आली. भारतीय फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्याकडून मिळणाऱ्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी ही योजना आखण्यात आली. अश्विन व जडेजा यांनी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पाच सामन्यांमध्ये एकूण ५४ बळी घेतले होते.
होवार्ड म्हणाले, ‘भारतात खेळण्यासाठी संघाच्या तयारीत मोंटीचे जुळणे चांगली बाब आहे. गोलंदाज काय करण्याचा प्रयत्न करणार आहे, याबाबत फलंदाजांनी विचार करावा, असे आम्हाला वाटते. त्यासाठी मोंटीची मदत होईल. या व्यतिरिक्त तो गोलंदाजांनाही मदत करणार आहे. (वृत्तसंस्था)
>फिरकी सल्लागारपदी श्रीधरन
मेलबोर्न : भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्यास सक्षम बनविण्यासाठी क्रिकेट आॅस्ट्रेलियाने माजी भारतीय फिरकीपटू श्रीराम श्रीधरनची फिरकी सल्लागारपदी नियुक्ती केली आहे. श्रीधरनने भारतातर्फे मार्च २००० ते डिसेंबर २००४ या कालावधीत ८ वन-डे सामने खेळले आहेत. त्यांनी गेल्या वर्षी आॅस्ट्रेलिया संघाची श्रीलंका दौऱ्यात आणि भारतात खेळल्या गेलेल्या विश्व टी-२० स्पर्धेदरम्यान मदत केली होती.

Web Title: Helping the poultry of Australia to take Australia to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.