....म्हणून पराभवानंतरही साक्षीला पदकाची शक्यता
By admin | Published: August 17, 2016 11:38 PM2016-08-17T23:38:26+5:302016-08-17T23:38:26+5:30
भारतासाठी पदकाची दावेदार महिला मल्ल आॅलिम्पिकच्या ५८ किलो वजन गटात रेपचेजद्वारे कांस्य पदकाची दावेदार ठरली आहे
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. १७ : भारतासाठी पदकाची दावेदार महिला मल्ल आॅलिम्पिकच्या ५८ किलो वजन गटात रेपचेजद्वारे कांस्य पदकाची दावेदार ठरली आहे. साक्षी क्वार्टरफायनलमध्ये रशियाच्या खेळाडूकडून पराभूत झाली. रशियाच्या महिला मल्लाने अंतिम फेरी गाठल्यामुळे साक्षीला कांस्यपदकाची लढत देण्याची संधी मिळाली.
साक्षीला रशियाची व्हॅलेरिया कोब्लोवा झोलोबोवा हिने ९-२ अशा फरकाने पराभूत केले होते. विनेश जखमी झाधल्याने ४८ किलो वजन गटात चीनची यानन सूनहिच्याविरुद्ध लढतीत माघार घेतली. विनेशला स्ट्रेचरवरून बाहेर आणावे लागले.
साक्षीला नमविणारी रशियाची मल्ल व्हॅलेरिया हिने सेमीफायनलमध्ये किर्गिस्तानची एसूलू तिनीबेकोवा हिला पराभूत करीत या गटाच्या अंतिम फेरीत धडक दिली. साक्षीचीही कांस्य पदकाची आशा पल्लवित झाली. तिला कांस्यपदकाच्या रेपेचेज लढतीत खेळण्याची संधी मिळणार आहे.
काय आहे रेपेचेज!
क्वार्टरफायनलमध्ये ज्या मल्लाकडून पराभव झाला तो मल्ल अंतिम फेरी गाठत असेल तर क्वार्टरमध्ये पराभूत झालेल्या मल्लाला कांस्य पदकाच्या लढतीत खेळण्याची संधी मिळते. कुस्तीतील या नियमाला रेपेचेज असे संबोधले जाते. साक्षीला याच नियमाचा लाभ झाला.