इथं कमाईत धवनने कोहलीला टाकले मागे

By admin | Published: June 8, 2017 06:21 PM2017-06-08T18:21:30+5:302017-06-08T18:25:50+5:30

कर्णधार विराट कोहली जाहिरातीच्या माध्यमांतून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असला तरी 2015-16 मध्ये आंतराष्ट्रीय सामन्यात

Here's how Dhawan got the money back | इथं कमाईत धवनने कोहलीला टाकले मागे

इथं कमाईत धवनने कोहलीला टाकले मागे

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ - नुकतेच फोर्ब्सने जगभरातील सर्वाधिक कमाई करणा-या 100 खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली. या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा समावेश असून यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे. कर्णधार विराट कोहली जाहिरातीच्या माध्यमांतून सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असला तरी 2015-16 मध्ये आंतराष्ट्रीय सामन्यात बीसीसीआय कडून मिळणाऱ्या मानधानात धवनने कोहलीवर मात केली आहे. बीसीसीआयने 25 लाखांपेक्षा जास्त मानधान मिळणाऱ्या खेळाडूंची माहिती आपल्या वेबसाईटवर जाहिर केली आहे. यामध्ये शिखर धवनचे मानधन 87.76 लाख रुपये आहे तर कर्णधार कोहलीचे मानधन 83.07 लाख रुपये आहे. या यादित अजिंक्य रहाणे तिसऱ्या क्रमांकावर असून 81.06 लाख रुपये आहे. तर चौथ्या स्थानावर आर. अश्विन आणि रोहित शर्मा असून त्याचे मानधन 73.02 लाख रुपये आहे. बीसीसीआयकडून दिले जाणाऱ्या मानधानात वरुण एरॉन सर्वात शेवटी असून त्याला 32.15 लाख रुपये मानधन मिळाले आहे. भारतीय संघाला न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मालिकेचेही मानधन देण्यात आले आहे.

Web Title: Here's how Dhawan got the money back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.