उच्च न्यायालयाचे डीडीसीएवर ताशेरे

By admin | Published: November 8, 2016 03:36 AM2016-11-08T03:36:37+5:302016-11-08T03:36:37+5:30

न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन निवड समिती सदस्यांना पदावरून हटवून दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आपली मर्यादा ओलांडली.

High Court DDCA | उच्च न्यायालयाचे डीडीसीएवर ताशेरे

उच्च न्यायालयाचे डीडीसीएवर ताशेरे

Next

नवी दिल्ली : न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन निवड समिती सदस्यांना पदावरून हटवून दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने आपली मर्यादा ओलांडली. त्यांच्या या कृतीने न्यायालयाचा अवमानही झाला आहे, अशा शब्दात दिल्ली उच्च न्यायालयाने डीडीसीएला फटकारले आहे.
न्यायालयाने नियुक्त केलेले निरीक्षक मुकुल मुदगल यांच्या निर्देशानुसार डीडीसीएने तीन निवड समिती सदस्य नेमले होते. या तिघांना नुकतेच डीडीसीएने पदावरून हटविले होते. या निर्णयामुळे संतापलेल्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्या. रवींद्र भट आणि दीपा शर्मा यांच्या खंडपीठाने डीडीसीएची ही कृती न्यायालयाचा अवमान असल्याचे म्हंटले आहे, असे करताना डीडीसीएने मुदगल यांना याची माहिती दिली होती का? अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे.

Web Title: High Court DDCA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.