‘हायव्होल्टेज’ - सायनासमोर पी. व्ही. सिंधूचे आव्हान

By admin | Published: March 31, 2017 10:56 AM2017-03-31T10:56:12+5:302017-03-31T12:11:06+5:30

घरच्या मैदानावर सुपरसीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी ऑलिम्पिक पदकविजेत्या सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यामध्ये आज लढत होणार आहे.

'Highway' V. Challenge of Sindhu | ‘हायव्होल्टेज’ - सायनासमोर पी. व्ही. सिंधूचे आव्हान

‘हायव्होल्टेज’ - सायनासमोर पी. व्ही. सिंधूचे आव्हान

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 : घरच्या मैदानावर सुपरसीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी ऑलिम्पिक पदकविजेत्या सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यामध्ये आज लढत होणार आहे. आज दुपारी 2 वाजाता ही लढत होणार आहे. काल झालेल्या सामन्यात  सायना आणि सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करत इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपुर्व फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे, आता हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरुध्द खेळणार असल्याने बॅडमिंटनप्रेमींमध्ये या ‘हायव्होल्टेज’ सामन्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
 
भारताच्या दोन अव्वल बॅडमिंटनपटूमध्ये हायव्होल्टेज लढत होणयाची ही दुसरी वेळ आहे.यापुर्वी 2014 मध्ये सय्यद मोदी ग्रॅन्ड पिक्स लढतीत सायनाने सिंधूचा दारुण पराभव केला होता. आता या हायव्होल्टेज लढतीत सिंधू आपल्या पराभवचा वचपा काढणार की सायना विजयाची पुनरावृत्ती करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दरम्यान, लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या सायनाने दोन वर्षांपूर्वी या स्पर्धेचे जेतेपद पटकावत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली होती. या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सायना आतुर आहे. मात्र गुडघ्याच्या दुखापतीमुळे सायनाच्या हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. तर 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये  पी.व्ही. सिंधूने रौप्य पदक जिंकत महिला बॅडमिंटनमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. 
 
काल झालेल्या लढतीत सायनाने थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा २१-१४, २१-१२ असा धुव्वा उडवला. तसेच, सिंधूने पुन्हा जपानच्या साएना कावाकामीचे कडवे आव्हान २१-१६, २३-२१ असे परतावले. आता पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या स्टार भारतीय शटलर्सनी इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतमध्ये एकमेंकाशी लढत लढणार आहेत. 

Web Title: 'Highway' V. Challenge of Sindhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.