शाब्बास Hima Das! आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक 'कोरोना वॉरियर्स'ना समर्पित!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 12:57 PM2020-07-25T12:57:44+5:302020-07-25T12:58:24+5:30
Hima Dasच्या या कृतीचं क्रीडा विश्वातून होतंय कौतुक...
भारताची सुवर्ण कन्या हिमा दास हिच्या नावावर आणखी एक सुवर्णपदक जमा झाले आहे. २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय मिश्र रिले संघाने ४ बाय ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. बहरीन संघाने सुवर्णपदक नावावर केले होते, परंतु त्यांची धावपटू केमी ॲडेकोया डोपिंगमध्ये दोषी आढळली. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे भारताचे रौप्यपदकाचे सुवर्णपदकात रुपांतरीत झाले. कोरोना व्हायरसच्या संकटात भारतीय क्रीडापटूंसाठी ही खूप मोठी आनंदाची वार्ता ठरली. हिमानं हे सुवर्णपदक कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या डॉक्टर, पोलीस आदी कोरोना वॉरियर्सना समर्पित केलं आहे. ( Hima Das delicated her upgraded gold medal to Coronawarriors)
भारताच्या या संघात हिमासह मोहम्मद अनास, पूवम्मा आणि अरोकीया राजीव यांचा समावेश होता. भारतीय ॲथलेटिक्स संघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले,"आता भारताच्या खात्यात ॲथलेटिक्स विभागात ८ सुवर्णपदकासह २० पदकं झाली आहेत. या आनंदाच्या बातमीमुळे पुढील वर्षी होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंचे मनोबल उंचावण्यास मदत होईल." ( Hima Das delicated her upgraded gold medal to Coronawarriors)
हिमाने या स्पर्धेत ४ बाय ४०० मीटर रिले महिला गटात सुवर्ण, तर ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले गटात भारतीय खेळाडूंनी ३ मिनिटे १५.७१ सेकंदाची वेळ नोंदवली होती. आजच्या निर्णयाने मिश्र गटातील पहिले विजेते हा मानही भारताला मिळाला आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या 13 लाख 39,067 इतकी झाली आहे. त्यापैकी 8 लाख 50,295 रुग्ण बरे झाले आहेत, तर 31,425 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. या संकटात कोरोनाशी दिवसरात्र मुकाबला करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आदी कोरोना वॉरियर्सचे सर्वच आभार मानत आहेत. पण, हिमानं आशियाई स्पर्धेतील हे सुवर्ण वॉरियर्सना समर्पित करून त्यांचे आभार मानले आहेत. ( Hima Das delicated her upgraded gold medal to Coronawarriors)
''आशियाई स्पर्धा 2018तील 4 बाय 400 मीटर मिश्र रिले स्पर्धेतील सुवर्णपदक मी डॉक्टर, पोलीस आदी कोरोना वॉरियर्सना समर्पित करत आहे. या आव्हानात्मक परिस्थिती आपल्या सुरक्षिततेसाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी हे वॉरियर्स नि: स्वार्थपणे सेवा करत आहेत. त्यांना सलाम,''असे हिमानं ट्विट केलं.
I would like to dedicate my upgraded gold medal of 4x400 mixed relay event of Asian Games 2018 to police, doctors and all other Coronawarriors who are working selflessly in these difficult times of Covid-19 to ensure our safety and good health. Respect for all #CoronaWarriors
— Hima (HD) (@HimaDas8) July 24, 2020
IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!
केमार रोचनं टाकलेल्या चेंडूचा अंदाज येण्यापूर्वीच बेन स्टोक्सची 'दांडी' गुल!
140 किलो वजनाच्या रहकीमचा अफलातून कॅच पाहिलात का? पाहा Video