सुवर्णकन्या हिमा दास 'UNICEF' ची सदिच्छादूत; युवकांना देणार मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 10:25 AM2018-11-15T10:25:59+5:302018-11-15T10:27:15+5:30
भारताच्या सुवर्णकन्याची UNICEF India ची युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : भारताची सुवर्णकन्या हिमा दासची UNICEF India ची युवा सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युवकांना निर्णयक्षमतेत कसे सहकार्य करावे आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी हिमा मार्गदर्शन करणार आहे. आसाममधील नागाव येथून २० किलोमीटर दूर असलेल्या कांधूलिमारी या दुर्गम भागातल्या हिमाने स्वकतृत्वावर मोठी भरारी घेतली आहे. त्यामुळे तिचे मार्गदर्शन युवकांसाठी नक्की प्रेरणादायी असेल.
They are the beautiful souls. #HappyChildrensDay 👼🏼 pic.twitter.com/P5HGYi85V3
— Hima Das (@HimaDas8) November 14, 2018
फिनलँड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत ४०० मीटरचे सुवर्ण जिंकून हिमाने इतिहास रचला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्यानंतर जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने ४०० मीटर शर्यतीचे रौप्य पटकवले. शिवाय महिलांच्या चार बाय ४०० मीटरचे सुवर्ण आणि ४०० मीटर मिश्र रिलेमध्ये सुवर्ण मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या अभिमानास्पद कामगिरीमुळे तिला अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.
Meet our Youth Ambassador, Hima Das!
— UNICEF India (@UNICEFIndia) November 14, 2018
The Asian Games medallist is @UNICEF India’s first ever youth ambassador as part of #WorldChildrensDay celebration.#GoBluepic.twitter.com/4WYieI6MhB
Thanks @IndianOilclhttps://t.co/kbQYnDurfF
— Hima Das (@HimaDas8) November 15, 2018
I’m honoured and grateful to be the first @UNICEFIndia Youth Ambassador. I look forward to encouraging and supporting children to achieve their dreams. Join me and #GoBlue this #ChildrensDaypic.twitter.com/7gpgYCJQni
— Hima Das (@HimaDas8) November 14, 2018