हिमा दासची पुन्हा सुवर्ण धाव!; झेक प्रजासत्ताकमध्ये तिरंगा फडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 04:44 AM2019-08-19T04:44:59+5:302019-08-19T04:45:11+5:30
युरोपीयन स्पर्धांमध्ये एकामागोमाग एक सुवर्ण पदकांचा धडाका लावलेल्या हिमाने २ जुलैपासून एकूण सहावे सुवर्ण पदक जिंकले.
नवी दिल्ली : जुलै महिन्यात सुवर्ण पदकांचा धडका लावलेल्या स्टार धावपटू हिमा दास हिने पुन्हा एकदा आपला जलवा दाखविताना झेक प्रजासत्ताक येथे अॅथलेटिकी मिटिनेक रीटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. यावेळी हिमाने ३०० मीटर धावण्याच्या शर्यतीत बाजी मारली. त्याचयुरोपीयन स्पर्धांमध्ये एकामागोमाग एक सुवर्ण पदकांचा धडाका लावलेल्या हि
पमाने २ जुलैपासून एकूण सहावे सुवर्ण पदक जिंकले. दरम्यान, या स्पर्धेत जगातील अव्वल धावपटूंचे सहभाग नव्हते. मात्र, असे असले, तरी हिमाच्या यशाचे महत्त्व मात्र कमी होत नाही. शनिवारी झालेल्या शर्यतीत सुवर्ण जिंकल्यानंतर हिमाने या यशाची माहिती टिष्ट्वटरवरून देताना म्हटले की, ‘झेक प्रजासत्ताकमध्ये आज अॅथलेटिकी मिटिनेक रीटर २०१९ स्पर्धेत ३०० मीटर शर्यतीत मी अव्वल स्थानी राहिले.’
्रमाणे, पुरुषांमध्ये ३०० मीटर शर्यतीत मोहम्मद अनसने सुवर्ण पटकावले. यासह स्पर्धेत भारतीयांचे वर्चस्व राहिले.दुसरीकडे मोहम्मद अनसनेही पुरुषांच्या ३०० मीटर शर्यतीमध्ये बाजी मारत, भारतीयांना जल्लोष करण्याची दुहेरी संधी दिली. त्याने ३२.४१ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याच वेळी, निर्मल टॉम या अन्य भारतीय धावपटूने ३३.०३ सेकंदाची वेळ देत, याच शर्यतीत कांस्य पदकाची कमाई केली.
अनसने ट्विट केले की, ‘झेक प्रजासत्ताक येथे अॅथलेटिकी मिटिनेक रीटर २०१९ स्पर्धेत पुरुष ३०० मीटर शर्यतीत सुवर्ण पदक ३२.४१ सेकंदाच्या वेळेसह जिंकण्याचा आनंद आहे.’ राष्ट्रीय विक्रमवीर असलेल्या अनसने सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये दोहा येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ४०० मीटर शर्यतीसाठी या आधीच पात्रता मिळविली आहे. मात्र, हिमाला अद्याप ही पात्रता मिळविण्यात यश आलेले नाही. (वृत्तसंस्था)