सुवर्णकन्या हिमा दासचा सुवर्ण चौकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 11:21 PM2019-07-18T23:21:12+5:302019-07-18T23:22:02+5:30

१५ दिवसांत जिंकले चौथे सुवर्णपदक

Hima Das won fourth Gold Medal | सुवर्णकन्या हिमा दासचा सुवर्ण चौकार

सुवर्णकन्या हिमा दासचा सुवर्ण चौकार

googlenewsNext


नवी दिल्ली : भारताची आघाडीची धावपटू हिमा दास हिने आपली सुवर्ण धाव कायम राखताना गेल्या १५ दिवसांत तब्बल चौथे सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला. झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या टबोर अ‍ॅथलेटिक्स मीट स्पर्धेत हिमाने २०० मीटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी केली. २३.२५ सेकंदाची वेळ देत तिने शानदार बाजी मारली.
या जबरदस्त कामगिरीनंतर १९ वर्षीय हिमाला संपूर्ण देशातून शुभेच्छांचे संदेश मिळत आहेत. सोशल मीडियावरही हिमावर मोठ्या प्रमाणात कौतुकांचा वर्षाव होत आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे हिमाने २०० मीटर शर्यतीत बाजी मारली असून दुसरीकडे, मोहम्मद अनस याने ४०० मीटर शर्यतीत अभिमानाने तिरंगा फडकावत सुवर्ण पदकावर नाव कोरले. त्याने ४५.५० सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर कब्जा केला.
दुसरीकडे, अनसने १५ दिवसांत ३ सुवर्ण पदकांसह एक कांस्य
पदक जिंकले. कुटनो स्पर्धेत त्याने ४०० मीटर शर्यतीत २१.१८ सेकंदासह सुवर्ण जिंकले होते. मात्र पोजनान स्पर्धेत त्याला २०.७५ वेळेसह तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. (वृत्तसंस्था)

हिमाची सुवर्ण कामगिरी
२ जुलैला पोजनान अ‍ॅथलेटिक्स
ग्रां. प्री. स्पर्धेत २०० मी. २३.६५ सेकंदासह शर्यतीत सुवर्ण.
७ जुलैला कुटनो अ‍ॅथलेटिक्स
मीट स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत २३.९७ सेकंदासह सुवर्ण.
१३ जुलै झेक प्रजासत्ताक
येथे क्लांदो अ‍ॅथलेटिक्स २०० मीटर शर्यतीत २३.४३ सेकंदासह सुवर्ण.

Web Title: Hima Das won fourth Gold Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.