हिजाब नाकारणा-या हिना सिद्धूने इराणच्या जनतेची मने जिंकली
By admin | Published: October 31, 2016 08:26 PM2016-10-31T20:26:22+5:302016-10-31T20:26:22+5:30
भारताची स्टार महिला नेमबाज हिना सिद्धू हिने हिजाब घालून खेळणे अनिवार्य असल्याचे समजताच इराणमधील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - भारताची स्टार महिला नेमबाज हिना सिद्धू हिने हिजाब घालून खेळणे अनिवार्य असल्याचे समजताच इराणमधील आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. हिनाच्या या कृतीला इराणच्या नागरिकांचा भरघोस पाठिंबा लाभला. इराणच्या सर्वच महिला खेळाडूंना खेळताना हिजाब घालावाच लागतो. हिनाने
हिजाबचा विरोध करीत तेथे आयोजित आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेवरच बहिष्कार टाकला. हिनाच्या या कृतीची इराणच्या सोशल मीडियावर वाहवा होत आहे. हिजाबच्या पक्षपाती कायद्यावर देखील या निमित्ताने टीकेची झोड उठली. अनेक जण हिनाच्या कृतीचे समर्थन करीत तिचे आभार मानत आहेत. फेसबुक पेजवर हिनाच्या कृतीचे तोंडभरून कौतुक सुरू झाले. या पेजवर हिनाचा फोटो प्रकाशित केला असून हिजाब न घातलेला हा फोटो आहे. सोबत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचेही छायाचित्र आहे. या फोटोत स्वराज डोक्यापासून पायापर्यंत झाकलेल्या आहेत. त्यांचा हा फोटो इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळेचा आहे.
हिनाच्या निर्णयाचे स्वागत करीत या पेजवर लिहिण्यात आले,‘आम्ही इराणी नागरिक नसलेल्या अनेकांना इराणमध्ये आमंत्रित करतो. पण कुठल्याही परिस्थितीत हिजाब घालणे ही आमची संस्कृती नाही. महिलांविरुद्ध पक्षपात करणारा हा नियम आहे. सर्व महिलांना याविरुद्ध आवाज उठविण्याचे स्वातंत्र्य आहे.’ या पोस्टवर मोहम्मद सईदी लिहितात,‘राजकारण फार वाईट आहे. या सर्व गोष्टी राजकारणात मागे पडतात. भारतात खेळांचे राजकारण झाले नाही, ही चांगली बाब म्हणावी लागेल.’ फिरोज माहवी यांनी दुस-या एका पोस्टवर लिहिले,‘आशियाई विजेता हिनाने हिजाबचा विरोध करण्यासाठी नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली.
परमेश्वराने या मुलीला आणधी ताकद द्यावी. हे परमेश्वरा, गेल्या ३७ वर्षांपासून थोपविण्यात आलेल्या हिजाब सक्तीविरुद्ध आवाज उठविणाºया सर्वच मुलींना तशी ताकद दे.’ दुसरीकडे हमिद्रेजा कंगरशाही या भारतीय खेळाडूच्या या कृतीवर नाराज
दिसल्या. त्यांनी फेसबुकवर लिहिले,‘मी देखील अनिवार्य हिजाबच्या विरोधात आहे. पण भारतीय मुलींनी नेहमी कायद्याचे पालन करायला हवे.’