बंगळुरू एफसीची ऐतिहासिक कामगिरी
By admin | Published: January 12, 2015 01:37 AM2015-01-12T01:37:45+5:302015-01-12T01:37:45+5:30
भारतीय कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या नवख्या बंगळुरू एफसीने प्रतिष्ठेचा ३६वा फेडरेशन चषक जिंकला.
मडगाव : भारतीय कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या नवख्या बंगळुरू एफसीने प्रतिष्ठेचा ३६वा फेडरेशन चषक जिंकला. आयलीगचा ‘चॅम्पियन’ आणि त्यानंतर फेडरेशन चषक पटकावत बंगळुरूने फुटबॉल क्षेत्रात दबदबा सिद्ध केला.
दोनच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या क्लबने अंतिम सामन्यात यजमान धेंपो स्पोटर््स क्लबविरुद्ध २-१ अशी सरशी साधली. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात उभय संघांनी सुरुवातीला पहिल्या तासात तुल्यबळ खेळ केला.
मात्र, ६३व्या मिनिटाला बंगळुरू एफसीने आघाडी मिळवली आणि सामन्याचे चित्र पालटले. ९व्या मिनिटाला बंगळुरूच्या खेळाडूला धेपोंच्या खेळाडूने गोलसर्कलमध्ये पाडल्याने बंगळुरूच्या संघाला पंच प्रताप सिंगने पेनल्टी बहाल केली, त्याच्या जोरावर बंगळुरू संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने सामन्याच्या पहिल्या गोलची नोंद केली. पहिल्या सत्राच्या शेवटच्या क्षणाला बंगळुरू संघाच्या जॉन जॉन्सनने त्यांच्या गोलसर्कलमध्ये गोल करण्याच्या प्रयत्नात असताना अमिरीला धरून ओढल्याने पंचांनी धेपोंच्या संघाला पेनल्टी दिली व यावर टोल्बे ओज्बेने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली व मध्यांतरापर्यंत सामना १-१ असा बरोबरीत राहिला.
दुसऱ्या सत्रातील ६५व्या मिनिटाला बैखोखेई बेंगायचोने दिलेल्या पासवर हेडरद्वारे रॉबिन सिंगने गोल करून बंगळुरू संघाला २-१ गोलची आघाडी मिळवून दिली. हाच गोल निर्णायक ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)