परतवाड्याच्या सुखमनी बाबरेकरची ऐतिहासिक कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:03 PM2018-04-09T22:03:04+5:302018-04-09T22:07:14+5:30
राष्ट्रीय वरिष्ठ गट धनुर्विद्या स्पर्धा : धीरजचा पराभव करून जिंकले महाराष्ट्रासाठी पहिले सुवर्ण
- शिवाजी गोरे
पुणे : महाराष्ट्राच्या १९ वर्षीय सुखमनी बाबरेकरने रिकर्व्ह प्रकारात आॅलिम्पिक खेळाडू जयंत तालूकदार, अनातू दास, तरुणदीप राय यांना मागे टाकून आणि अंतिम लढतीत आंध्र प्रदेशच्या बी. धीरजचा ६-० गुणांनी पराभव करून वरिष्ठ गट धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकावर हक्कप्रस्थापित करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. महिला गटात आॅलिम्पियन झारखंडच्या दीपिका कुमारीने आपल्याच संघाच्या अंकिता भगतला ६-० गुणांनी नमवित सुवर्णपदक जिंकले.
आर्चरी असोसिएशन आॅफ इंडियाच्या मान्यतेने घोरपडी येथील आर्मी स्पोटर््स इन्स्टिट्युट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोमवारी सायंकाळी झालेल्या अंतिम लढतीत अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या परतवाडा येथील धनुर्विद्यापटू सुखमनी बाबरेकरने तिनही फेºयांमध्ये अचूक लक्ष्य साधून आपल्या महाराष्टÑासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. प्रथम लक्ष्य साधताना बी. धीरजने पहिल्या फेरीत (९,७,८) २५, तर सुखमनी बाबरेकरने पहिल्या फेरीत (९, १०, ९ ) २८ गुणांचे लक्ष्य साधून २ गुण संपादन केले. नंतर दुसºया फेरीत धीरजने (१०,८,७) २६, तर सुखमनीने (१०.९.८) २७ गुणांचे संपादन करून पुन्हा २ गुण संपादन केले. तिसºया व अंतिम फेरीत धीरजचे (९,९,८) २६, तर सुखमनीने (१०,९,८) २७ गुणांची कमाई करून, धीरजचा ६-० गुणांनी पराभव केला. या दोघांना अंतिम लढतीत तीन, तीन बाणांचे लक्ष्य पाच फेºयांत साधायचे होते. जो अचूक लक्ष्य साधून जास्त गुण संपादन करेल त्याला दोन गुण मिळणार होते. सुखमनीने पहिल्या तीन फेºयांतच ६ गुण संपादन करून सुवर्ण पदकावर कब्जा केला.
महिलांच्या अंतिम रिकर्व्ह प्रकारात आॅलिम्पियन दीपिका कुमारीने पहिल्या फेरीत (१०.१०.९) २९, दुस-या फेरीत (१०.९.८) २७, तिसºया फेरीत (१०,१०,९) २९ गुण संपादन करून सुवर्णपदक जिंकले. तिच्या संघाच्या अंकिता भगतला पहिल्या फेरीत (९,८,८) २५, दुसºया फेरीत (९,९,८) २६ व तिसºया फेरीत (१०,९,८) २७ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सुवर्णपदक जिंकल्यामुळे खूप आनंद झाला आहे. ज्युनिअर खेळाडू असूनसुद्धा आॅलिम्पिक खेळाडूंना मागे टाकत ही कामगिरी केली याचा जास्त आनंद आहे. आता आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि टोकियो आॅलिम्पिकसाठी सराव सुरू करणार आहे.
-सुखमनी बाबरेकर