85 वर्षाच्या भारतीय क्रिकेट विश्वातील विराटसेनेचा ऐतिहासिक विक्रम
By admin | Published: March 28, 2017 01:15 PM2017-03-28T13:15:17+5:302017-03-28T13:35:47+5:30
अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली.
ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेली बॉर्डर-गावस्कर मालिका खेळाडूंनी ठोकलेली शतकं, बळींची रास आणि त्यापेक्षा प्रतिस्पर्धी खेळाडूंमधील बाचाबाची, स्लेजिंगमुळे चर्चेचा विषय ठरली. पण अखेरीस भारतीय संघाने कसोटीतील आपली दादागिरी कायम राखत मालिकेत ऑस्ट्रेलियाला लोळवलं. आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 2-1 ने खिशात घातली. कसोटी क्रमवारीतील नंबर एकवर असलेल्या टीम इंडियाने यंदाच्या हंगामात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. भारताच्या कसोटी इतिहासाच्या 85 वर्षात पहिल्यांदाच असा पराक्रम विराटसेने केला आहे.
2015मध्ये भारतीय संघाची श्रीलंका विरोधात विजयी रथाला सुरुवात झाली होती, अद्याप ती कायम आहे. ऑस्ट्रेलियाला पराभव करत सलग सातव्या वेळीस भारताने विजय मिळवला. हा भारताच्या कसोटी इतिहासात आतापर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे. जागतिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासाचा विचार केल्यास रिकी पॉटिंगने आतापर्यंत सलग सर्वात जास्त विजय मिळवले आहेत. पॉटिंगने सलग 9 वेळा मालिका विजय मिळवला आहे.
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पुणे येथे खेळलेल्य़ा पहिल्या सामन्यात भारतीय संघाला 333 धांवानी पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवत मालिकेत बरोबरी केली. आणि तिसरा कसोटी अनिर्णीत राखण्यात कांगारुंना यश आले होते. मालिकेत पहिला कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर भारताने चौथ्या वेळेस कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध 1972-73 मध्ये, 2000-01 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि 2015 मध्ये श्रीलंकविरुद्ध भारताने अशी कामगिरी केली होती.
विराटसेनेचे सलग सात मालिकाविजय
- - भारत विरुद्ध श्रीलंका 2-1 (3 टेस्ट) : 2015
- - भारत विरुद्ध द. अफ्रीका 3-0 (4) : 2015-16
- - भारत विरुद्ध वेस्टइंडीज 2-0 (4) : 2016
- - भारत विरुद्ध न्युझीलंड 3-0 (3) : 2016-17
- - भारत विरुद्ध इंग्लैंड 4-0 (5) : 2016-17
- - भारत विरुद्ध बांग्लादेश 1-0 (1) : 2016-17
- - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2-1 (4) : 2016-17