लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय

By admin | Published: July 22, 2014 12:09 AM2014-07-22T00:09:56+5:302014-07-22T00:09:56+5:30

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर 28 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने विजयाला गवसणी घालताना पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली.

Historical triumph at Lords | लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय

लॉर्ड्सवर ऐतिहासिक विजय

Next
लंडन : वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने आखूड टप्प्याचा मारा करीत इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजविले आणि भारताने आज पाचव्या व शेवटच्या दिवशी संपलेल्या दुस:या कसोटी सामन्यात यजमान संघाचा 95 धावांनी पराभव केला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर 28 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारताने विजयाला गवसणी घालताना पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळविली. ईशांत शर्माने कारकिर्दीतील सवरेत्तम कामगिरी करताना 74 धावांच्या मोबदल्यात 7 बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने दिलेल्या 319 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव आज पाचव्या दिवशी उपाहारानंतर 88.2 षटकांत 223 धावांत संपुष्टात आला. 
आज बाद झालेल्या 6 फलंदाजांपैकी ईशांतने पाच फलंदाजांना माघारी परतवले, तर एक फलंदाज धावबाद झाला. लॉर्ड्सवर भारताचा 17 सामन्यांतील हा दुसरा विजय ठरला. यापूर्वी 1986 मध्ये कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने 5 गडी राखून विजय मिळविला होता. भारताचा विदेशात हा 15 सामन्यानंतर पहिला विजय ठरला. भारताने यापूर्वी विदेशात अखेरचा विजय जून 2क्11 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध किंग्स्टनमध्ये मिळविला होता. 
सकाळच्या सत्रत खेळपट्टीवर जड रोलर चालविण्यात आल्यामुळे खेळपट्टीचे स्वरूप थोडे बदलले होते; पण आखूड टप्प्याचा मारा करण्याची ईशांतची रणनीती यशस्वी ठरली. कालच्या 4 बाद 1क्5 धावसंख्येवरून पुढे खेळताना जो रुट (66) व मोईन अली (39) यांनी पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केल्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता; पण ईशांतने अचूक मारा करीत भारताला विजय मिळवून दिला. 
ईशांतने शॉर्ट पिच चेंडूचा वापर करताना उपाहारापूर्वी अखेरच्या चेंडूवर मोईन अली याला बाद केले. त्यानंतर दुस:या सत्रतील सुरुवातीच्या सात चेंडूंमध्ये रुटसह तीन फलंदाजांना माघारी परतवत भारताचा विजय निश्चित केला. मोईन बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या डावाला गळती लागली. उपाहारानंतर मॅट प्रायर (12), बेन स्टोक्स (क्) आणि जो रुट (66) यांना शॉर्ट पिच चेंडूवर बाद करीत भारताने विजयाची मजबूत पायाभरणी केली. ईशांतने त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉडला (8) यष्टिरक्षक धोनीकडे ङोल देण्यास भाग पाडले. रवींद्र जडेजाने जेम्स अँडरसनला धावबाद करीत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
नॉटिंघममध्ये अनिर्णित संपलेल्या लढतीत अँडरसनवर जडेजाला शिवीगाळ केल्याचा व धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. दुस:या कसोटीपूर्वी यावर चर्वितचर्वण सुरू होते. क्रिकेटची पंढरी 
मानल्या जाणा:या लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या या लढतीचे पारडे ईशांतच्या पाचव्या दिवशीच्या स्पेलपूर्वी दोलायमान होते. 
लॉर्ड्सवर विदेशी गोलंदाजातर्फे ही पाचवी सवरेत्तम कामगिरी ठरली. या मैदानावर उपखंडातील वेगवान गोलंदाजाची ही सवरेत्तम कामगिरी ठरली. उभय संघांदरम्यान तिसरा कसोटी सामना 27 जुलैपासून साऊथम्पटनमध्ये खेळला जाणार आहे. 
 
इंग्लंड दुसरा डाव :- सॅम रोबसन पायचित गो. जडेजा क्7, अॅलिस्टर कुक ङो. धोनी गो. ईशांत 22, गॅरी बॅलन्स ङो. धोनी गो. शमी 27, इयान बेल त्रि.गो. ईशांत क्1, जो रुट ङो. बिन्नी गो. ईशांत 66, मोईन अली ङो. पुजारा गो. ईशांत 39, मॅट प्रायर ङो. विजय गो. ईशांत 12, बेन स्टोक्स ङो. पुजारा गो. ईशांत क्क्, स्टुअर्ट ब्रॉड ङो. धोनी गो. ईशांत क्8, लिअम प्लंकेट नाबाद क्7, जेम्स अँडरसन धावबाद क्2. अवांतर (32). एकूण 88.2 षटकांत सर्व बाद 223. बाद क्रम : 1-12, 2-7क्, 3-71, 4-72, 5-173, 6-198, 7-2क्1, 8-2क्1, 9-216, 1क्-223. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार 16-7-21-क्, मोहम्मद शमी 11-3-33-1, ईशांत शर्मा 23-6-74-7, रवींद्र जडेजा 32.2-7-53-1, मुरली विजय 4-1-11-क्, शिखर धवन 2-क्-2-क्
 
विजयाचे शिल्पकार
अजिंक्य रहाणो-
पहिल्या डावात शतक
तळाच्या फलंदाजांना घेऊन भारताला चांगली धावसंख्या उभारुन दिली
 
भुवनेश्वर कुमार-
पहिल्या डावात सहा बळी 
दुस:या डावात अर्धशतक झळकावून जडेजाला चांगली साथ दिली.
 
मुरली विजय-
दुस:या डावात चिकाटीने फलंदाजी करत 95 धावा केल्या 
तिस:या दिवशी चेतेश्वर पुजाराबरोबर 78 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी
 
रवींद्र जडेजा
दुस:या डावात 68 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी 
जेम्स अँडरसनला धावबाद करून विजयावर शिक्कामोर्तब़
 
ईशांत शर्मा-
दुस:या डावात सात बळी घेतले. 
74 धावांत 7 बळी ही कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी
 
अजिंक्य रहाणोच्या (1क्3) शतकी खेळीनंतरही भारताला पहिल्या डावात 295 धावांची मजल मारता आली.  
 
भारताच्या दुस:या डावात मुरली विजय (95), जडेजा (68) आणि भुवनेश्वर कुमार (52) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. भुवनेश्वरने पहिल्या डावात अचूक मारा करीत 82 धावांच्या मोबदल्यात 6 बळी घेतले.
 
भारताच्या दोन वेगवान गोलंदाजांनी एका सामन्यात 6 किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईशांतने 74 धावांच्या मोबदल्यात 7 बळी घेतले. 
 
 
 

 

Web Title: Historical triumph at Lords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.