श्रीलंकेचा ऑस्ट्रेलियावर 17 वर्षांनी ऐतिहासिक विजय
By Admin | Published: July 30, 2016 05:35 PM2016-07-30T17:35:04+5:302016-07-30T17:35:04+5:30
लेकल कसोटीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे, तब्ब्ल 17 वर्षांनी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे
>ऑनलाइन लोकमत -
कोलंबो, दि. 30 - पालेकल कसोटीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर 106 धावांनी मात करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धचा श्रीलंकेचा मिळवलेला हा दुसराच विजय आहे. तब्ब्ल 17 वर्षांनी श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.
याअगोदर 1999 मध्ये श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरोधात विजय मिळवला होता. दुसरा विजय मिळवण्यासाठी त्यांना तब्बल 17 वर्ष वाट पाहावी लागली आहे. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपर्तंय 27 कसोटी सामने झाले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियानं 17 सामने जिंकले असून आठ लढती अनिर्णित राहिल्यात.
श्रीलंकेच्या या विजयात कुशल मेंडिस आणि रंगना हेराथचा महत्वाचा वाटा आहे. श्रीलंकेचा पहिला डाव फक्त 117 धावांवर आटोपला होता. त्यानंतर श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 203 वरच रोखलं होतं. मग दुसऱ्या डावात कुशल मेंडिसच्या झुंजार 176 धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेनं 353 धावांची मजल मारून, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 268 धावांचं लक्ष्य दिलं होतं. पण कांगारूंना 161 धावांचीच मजल मारता आली. हेराथनं पाच तर संदाकननं तीन विकेट्स काढल्या. कुशल मेंडिसला सामनावीराच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
सलग 25 ओव्हर मेडन टाकण्याचा विक्रम
श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी सलग सर्वाधिक निर्धाव षटकं टाकण्याचा विक्रम रचला आहे. एकाच कसोटी सामन्यात सलग 25 हून अधिक षटकं एकही धाव न देण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर जमा झाला आहे.