ऐतिहासिक! दोन तासांत पूर्ण मॅरेथॉन जिंकत ऑलिम्पिक चॅम्पियनने रचला विश्वविक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 18:17 IST2019-10-12T18:15:14+5:302019-10-12T18:17:43+5:30
हा इतिहास रचला आहे तो ऑलिम्पिक चॅम्पियन एलियुड किपचोगे या केनियाच्या धावपटूने. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला धावपटू ठरला आहे.

ऐतिहासिक! दोन तासांत पूर्ण मॅरेथॉन जिंकत ऑलिम्पिक चॅम्पियनने रचला विश्वविक्रम
मुंबई : पूर्ण मॅरेथॉन म्हणजे जवळपास 42 किलोमीटरची शर्यत. हे अंतर दोन तासांच्या आतमध्ये पूर्ण करत विश्वविक्रम रचला गेला आहे. हा इतिहास रचला आहे तो ऑलिम्पिक चॅम्पियन एलियुड किपचोगे या केनियाच्या धावपटूने. ही कामगिरी करणारा तो जगातील पहिला धावपटू ठरला आहे.
HISTORY! pic.twitter.com/qjLfofhL5s
— Eliud Kipchoge (@EliudKipchoge) October 12, 2019
यापूर्वी पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेचा विक्रम 2 तास आणि 39 मिनिटे असा होता. हा विक्रमही किपचोगेच्या नावावर होता. 2018 साली झालेल्या बर्लिन येथील मॅरेथॉन शर्यतीमध्ये किपचोगेने हा विक्रम बनवला होता. पण आज किपचोगेने आपलाच विक्रम मोडीत काढला आहे.
या विश्वविक्रमानंतर किपचोगे म्हणाला की, " दोन तासांमध्ये पूर्ण मॅरेथॉन पूर्ण करणार मी जगातील पहिला खेळाडू ठरलो आहे. या विश्वविक्रमाने सर्वांना मी प्रेरणा देऊ इच्छितो. आपण सारे जगाला सुंदर आणि शांतीपूर्ण बनवू शकतो."