भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढतींचा इतिहास
By admin | Published: November 8, 2016 03:10 PM2016-11-08T15:10:51+5:302016-11-08T15:09:40+5:30
कसोटी मालिकेच्या निमित्ताने दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 लढतींच्या इतिहासाचा आढावा.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमध्ये झालेल्या गेल्या तीन कसोटी मालिकांमध्ये इंग्लंडने भारताला मात दिली होती. त्यामुळे आता घरच्या मैदानावर होणाऱ्या कसोटी मालिकेत त्या पराभवांचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ इच्छुक आहे. या मालिकेच्या निमित्ताने दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेंटी-20 लढतींच्या इतिहासाचा आढावा.
भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 112 कसोटी सामने खेळवले गेले आहेत. त्यापैकी भारताने 21 सामने जिंकले असून, 43 सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आहे. तर 48 सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये भारतात खेळवल्या गेलेल्या 55 कसोटी सामन्यांपैकी 15 सामने भारताने जिंकले आहेत. तर तर 13 सामन्यांत इंग्लंडने विजय मिळवला आहे. तर 27 सामने अनिर्णित राहिलेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंडमध्ये खेळवल्या गेलेल्या 57 कसोटी सामन्यांपैकी केवळ 6 सामने भारताला जिंकता आले आहेत. तर 30 सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तर 21 सामने अनिर्णित राहिले आहेत.
दोन्ही संघामध्ये 2011 पासून खेळवण्यात आलेल्या 13 कसोटी सामन्यांपैकी 9 सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तर केवळ दोन सामने भारताला जिंकता आले आहेत. उर्वरित दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवले गेलेले कसोटी सामने
सामने | भारतात | इंग्लंडमध्ये | |
एकूण सामने | 112 | 55 | 57 |
भारत विजयी | 21 | 15 | 6 |
इंग्लंड विजयी | 43 | 13 | 30 |
अनिर्णित | 48 | 27 | 21 |
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवले गेलेले एकदिवसीय सामने
सामने | भारतात | इंग्लंडमध्ये | त्रयस्त ठिकाणी | |
एकूण सामने | 93 | 45 | 38 | 10 |
भारत विजयी | 50 | 29 | 15 | 6 |
इंग्लंड विजयी | 38 | 15 | 19 | 4 |
टाय | 2 | 1 | 1 | - |
अनिकाली | 3 | - | 3 | - |
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवले गेलेले ट्वेटीं-20 सामने
सामने | |
एकूण सामने | 8 |
भारत विजयी | 3 |
इंग्लंड विजयी | 5 |