सतनामने रचला इतिहास
By Admin | Published: June 27, 2015 01:16 AM2015-06-27T01:16:02+5:302015-06-27T01:16:02+5:30
भारताच्या सतनाम सिंग या बास्केटबॉलपटूने इतिहास घडवला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या एनबीए या अमेरीकेच्या बास्केटबॉल लीग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे
नवी दिल्ली : भारताच्या सतनाम सिंग या बास्केटबॉलपटूने इतिहास घडवला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या एनबीए या अमेरीकेच्या बास्केटबॉल लीग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी निवड झालेला सतनाम हा पहिला वहिला भारतीय असल्याने जागतिक बास्केटबॉल क्षेत्रामध्ये भारताचे नाव चमकले आहे.
तब्बल ७ फूट २ इंच उंचीचा सतनाम एनबीएमध्ये डैलस मैवरिक्स या संघाकडून खेळणार असून एनबीए स्पर्धेच्या एकुन ७१ वर्षांच्या इतिहासामध्ये खेळणार तो पहिला भारतीय ठरणार आहे. सतनाम सिंग भामरा असे पुर्ण नाव असलेला हा खेळाडू अमेरीकेच्या फ्लोरीडा शहरातील आयएमजी अकादमीमध्ये शिकत असून या कालवधीत कॉलेज स्तरावरील बास्केटबॉल स्पर्धांत सतनामने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यामुळेच डैलस मैवरिक्स संघाने त्याला करारबध्द केले. विशेष म्हणजे डैलस संघाने २०११ साली एनबीएचे विजेतेपद पटकावले होते. शिवाय या संघामध्ये डर्क नोविट्जस्की सारख्या स्टार खेळाडंूचा समावेश आहे.
दरम्यान, गुरसिमरन ‘सिम’ भुल्लर एप्रिल महिन्यात सैक्रोमेंटो किंग्स संघाकडून एनबीए स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय वंशाचा खेळाडू ठरला होता. डैलास संघाबाबत सांगायचे झाल्यास १९८०-८१ पासून या संघाने सुरुवात केल्यानंतर तीन डिव्हीजन विजेतेपद (१९८७, २००७ आणि २०१०), दोन कॉन्फ्रन्स अजिंक्यपद (२००६ आणि २०११) आणि एक एनबीए विजेतेपद (२०११) पटकावले आहेत.
त्याचवेळी सतनाम यापूर्वी एकूण ७ विविध संघाकडून खेळला असून यामध्ये बोस्टन कैलटिक्स, सैक्रोमेंटो किंग्स, वॉशिंग्टन विजडर्स, डैलास मैवरिक्स, ह्यूस्टन रॉकेट्स, सैन एंटिनिओ आणि पोर्टलैंड ट्रायलबेलजर्स या संघांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)