आयपीएलमध्ये निचांकी धावसंख्येचा इतिहास

By admin | Published: April 24, 2017 12:31 AM2017-04-24T00:31:12+5:302017-04-24T07:12:34+5:30

ईडन्स गार्डनवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगलुरूने आपल्या नावावर निचांकी विक्रमाची नोंद

The history of the shortest innings in the IPL | आयपीएलमध्ये निचांकी धावसंख्येचा इतिहास

आयपीएलमध्ये निचांकी धावसंख्येचा इतिहास

Next

आकाश नेवे / ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 24 - ईडन्स गार्डनवर झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चँलेजर्स बंगलुरूने आपल्या नावावर निचांकी विक्रमाची नोंद केली. विराट आणि कंपनीने केकेआर विरोधात फक्त ४९ धावा केल्या. केकेआरच्या भेदक गोलंदाजीसमोर आरसीबीच्या फलंदाज खेळपट्टीवर हजेरी लावून परतले.

विस्फोटक ख्रिस गेल, रन मशिन विराट कोहली, धडाकेबाज एबीडी, फटकेबाजीत धुरंधर असलेला केदार जाधव असे सरस फलंदाज असलेल्या रॉयल चँलेजर्स बंगलुरू संघाने आयपीएलच्या दहाही पर्वातील सर्वात निचांकी धावसंख्या नोंदवली. आरसीबीच्या एकाही फलंदाजात दुहेरी आकडा गाठता आला नाही. तर पुर्ण संघाला १० षटकेही खेळून काढता आली नाही. पूर्ण संघ फक्त ५८ धावात बाद झाला. चौथ्या आणि सहाव्या षटकाचा अपवाद सोडला तर प्रत्येक षटकांत आरसीबीने गडी गमावला आहे.

आरसीबीच्या या पतनाची सुरूवातच झाली ती विराट कोहलीपासून. पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर कोहली बाद झाला. त्यानंतर मनदीप सिंहला बढती देण्याचा निर्णय पुन्हा एकदा अपयशी ठरला. जखमेनंतर पुनरागमन करणारा डिव्हिलियर्सही तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजांनी फक्त खेळपट्टीवर हजेरी लावली.

श्रीनाथ अरविंद याने नवव्या षटकातील पाचव्या चेंडूवर व्होक्सला एक चौकार लगावला. मात्र हा चौकार गेला कसा हे त्याला देखील कळले नाही. आरसीबीच्या एकाही फलंदाजांच्या खेळी आत्मविश्वास जाणवून येत नव्हता. एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलंडता आली नाही. तीन फलंदाज तर शुन्यावर बाद झाले. केदार जाधव याने सर्वाधिक ९ धावा केल्या.

केकेआरच्या गोलंदाजांनी पुन्हा एकदा प्रशिक्षक जॅक कॅलीस यांचा विश्वास सार्थ ठरवला. कुल्टर - नाईल, व्होक्स, डी - ग्रॅण्डहोम या तिकडीने आरसीबीच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावु दिले नाही.

गौतम गंभीरच्या आक्रमक नेतृत्वाने हा सामना जिंकला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्याने आक्रमक क्षेत्ररक्षण लावले. मागच्या गेल्या काही सामन्यांपासून क्षेत्ररक्षणात केलेले बदल केकेआरसाठी फायदेशीर ठरले आहेत. इडन्सच्या खेळपट्टीशी चांगला परिचित असलेल्या गंभीरने या सामन्यात चार जलदगती गोलंदाजांना खेळवण्याचा निर्णय घेतला. तो चांगलाच फायदेशीर ठरला. त्याने या सामन्यात एकाही फिरकीपटूला गोलंदाजी दिली नाही. आरसीबीच्या फिरकीने केकेआरला गोत्यात आणल्यावरही त्याने फिरकीपटूला गोलंदाजी देण्याचा मोह टाळला.

आरसीबीने नोंदवलेली ४९ ही सर्वात निचांकी धावसंख्या आहे. याबाबतीत त्यांनी २००९ चा राजस्थान रॉयल्सचा विक्रम मोडला. राजस्थानने त्या सामन्यात आरसीबी विरोधात ५८ धावा केल्या होत्या.

निचांकी धावसंख्या नोंदवणारे दहा संघ-

-आरसीबी - ९.५ षटकांत ४९ विरुद्ध केकेआर, आयपीएल २०१७

-राजस्थान रॉयल्स १५.१ षटकांत ५८  विरुद्ध आरसीबी आयपीएल २००९

-मुंबई इंडियन्स १५.२ षटकांत ६७ विरुद्ध केकेआर आयपीएल २००८

-आरसीबी १५ षटकांत ७०विरुद्ध राजस्थान रॉयल्स आयपीएल २०१४

-कोची टस्कर्स केरला १६.३ षटकांत ७४ विरुद्ध डेक्कन चाजर्स आयपीएल २०११

Web Title: The history of the shortest innings in the IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.